सकाळी रिकाम्या पोटी खावीत 'ही' फळं; अनेक आजारांपासून मिळेल मुक्ती

फळे खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. जर तुम्ही दररोज रिकाम्या पोटी फळांचे सेवन केले तर तुमच्या शरीराला त्याचा फायदा होतो. यामुळे, रिकाम्या पोटी फळे खाण्याचे अनेक फायदे जाणून घ्या.

Aug 12, 2023, 06:00 AM IST
1/5

डाळिंबात व्हिटॅमिन सी, जीवनसत्त्वे, अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात, ज्यामुळे हृदय निरोगी होते. रोज रिकाम्या पोटी डाळिंब खाल्ल्याने विषाणूजन्य आजारांपासून बचाव होतो.

2/5

पपईमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी असतं. जे पचनक्रिया मजबूत करतात. रोज सकाळी रिकाम्या पोटी पपई खाल्ल्याने आतड्यांसंबंधीची समस्या दूर होते.  

3/5

द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि अनेक अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात. याच्या सेवनाने हाडे मजबूत राहतात, त्यामुळे रोज सकाळी रिकाम्या पोटी द्राक्षांचे सेवन करावे.

4/5

केळ्यामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन बी6, फायबर यांसारखे पोषक घटक असतात. रोज सकाळी रिकाम्या पोटी केळ खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. शिवाय यामुळे दिवसभर शरीरात एनर्जी राहते. 

5/5

सफरचंदात फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंटचे गुणधर्म आढळतात. यामुळे पचनक्रिया मजबूत होते. रोज 1 सफरचंद रिकाम्या पोटी खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं.