Entertainment : मराठी चित्रपटांची कोटीची कोटी उड्डाणं, पाहा कोट्यवधींची कमाई करणारे 'टॉप 10' चित्रपट

Marathi Movie : दमदार कथा आणि कसदार अभिनयाच्या जोरावर गेल्या काही काळात अनेक मराठी चित्रपटांनी (Marathi Movie) बॉक्स ऑफिसवर (Box Office) प्रचंड यश मिळवलं आहे. 'सैराट'पासून (Sairat) 'व्हेंटिलेटर'पर्यंत (Ventiletar) अनेक चित्रपटांनी कोट्यवधींची कमाई केली आहे. इतकंच काय तर या चित्रपटांनी अनेक पुरस्कारही पटकावले आहेत. आज आपण असेच काही चित्रपट पाहाणार आहोत, ज्या चित्रपटांनी कोटीची कोटी उड्डाण घेतली आहेत.

| Jun 05, 2023, 20:35 PM IST
1/10

सैराट

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट आहे, हा चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित झाला आणि तो प्रचंड यशस्वी ठरला.जाती व्यवस्थेवर आधारीत या चित्रपटाने आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढत 110 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, कोलकाता, भिलाई, रायपूर, कर्नाटक, तेलंगण या ठिकाणी इंग्रजी उपशीर्षकांसहित प्रदर्शित करण्यात आला. या कथेवर हिंदी चित्रपटही बनवण्यता आला होता.

2/10

वेड

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने वेड या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण केलं. पहिल्याच झटक्यात या चित्रपटाने 74 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटात जेनेलिया डिसूझा आणि रितेश देशमुख मुख्य भूमिकेत आहेत. प्रेयसीवर वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या सत्त्याचं क्रिकेटवरही तेव्हढाच प्रेम असतं. मात्र मात्र त्याच्या आयुष्यात असं काही घडतं की तो या दोन्ही गोष्टीपासून लांब जातो. नंतरच्या त्याच्या आयुष्यात फक्त दोन गोष्टी असतात एक म्हणजे व्यसन आणि म्हणजे त्याल जीवापाड प्रेम करणारी त्याची बायको श्रावणी, अशी या चित्रपटाची कथा आहे.

3/10

नटसम्राट

नटसम्राट हा 2016 मध्ये प्रदर्शित झालेला मराठी ऐतिहासिक चित्रपट आहे. या चित्रपटात दिग्गज अभिनेते नाना पाटेकर मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट निवृत्त अभिनेता आणि त्याच्या कुटुंबाभोवती फिरतो. ₹ 45 कोटींच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनसह नटसम्राटला व्यावसायिक यश लाभले. तो आजही सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो.

4/10

कट्यार काळजात घुसली

सचिन पिळगावकर, शंकर महादेवन, सुबोध भावे आणि अमृता खानविलकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'कट्यार काळजात घुसली' हा चित्रपट दोन संगीतमय कुटुंबांमधील संघर्षावर आधारित आहे. कट्यार काळजात घुसली या चित्रपटाचे दिग्दर्शन सुबोध भावे यांनी केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 40 कोटींहून अधिक कमाई केली

5/10

लय भारी

निशिकांत कामत दिग्दर्शित, 'लय भारी' हा एक अॅक्शन-ड्रामा चित्रपट असून त्यात रितेश देशमुख मुख्य भूमिकेत आहे. 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ₹35 कोटींहून अधिक कमाई केली. या चित्रपटाच्या माध्यमातून रितेशने मराठी चित्रपटात पदार्पण केलं. विशेष म्हणजे बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानने या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका केली आहे.   

6/10

टाईमपास 2

रवी जाधव दिग्दर्शित 'टाईमपास 2' हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. दोन भिन्न वर्गातील तरुण प्रेयसी-प्रियकरातील नातेसंबंधांवर हा चित्रपट आधारीत आहे.  टाइमपास 2 मध्ये प्रिया बापट आणि प्रियदर्शन जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 35 कोटींची कमाई केली होती.

7/10

टाईमपास

रवी जाधव दिग्दर्शित टाईमपास हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर मुख्य भूमिकेत आहेत. 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ₹30 कोटींहून अधिक कलेक्शन केलं. 

8/10

दुनियादारी

संजय जाधव दिग्दर्शित 'दुनियादारी'ने 28 कोटींहून अधिक कमाई केली. श्रेयस, शिरीन आणि मीनाक्षी यांच्यातील प्रेम त्रिकोण हा चित्रपटाचा मुख्य घटक आहे. स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, उर्मिला कोठारे आणि सई ताम्हणकर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

9/10

'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय'

'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' हा दिनकर मारुती भोसले या सामान्य मराठी माणसाची कथा दाखवणारा हा चित्रपट आहे. आपल्याच मातीत मराठी माणसाला करावा लागणारा संघर्ष या चित्रपटात दाखवला गेला आहे. संतोष रामदास मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव यांसारखे प्रसिद्ध कलाकार होते. मी शिवाजीराजे भोसले बोलतोयने बॉक्स ऑफिसवर सुमारे 24 कोटींची कमाई केली

10/10

व्हेंटिलेटर

राजेश मापुस्कर दिग्दर्शित व्हेंटिलेटर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 23 कोटींहून अधिक कमाई करत व्यावसायिक यश मिळवले. गजू काका शेवटचा श्वास घेत असताना, त्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांना हॉस्पिटलमध्ये गोळा होतं. हॉस्पिटलच्या वेटिंग एरियात जिथे अनेक दिवसांनी कुटुंब पुन्हा एकत्र आले आहे या वर हा चित्रपट आहे . तन्वी अभ्यंकर, कीर्ती आडारकर, पौर्णिमा अहिरे आणि सतीश आळेकर हे  मुख्य कलाकार आहेत.