पठाणनंतर दीपिकाचं ऋतिक रोशनसोबत बिकनी साँग... पाहा Deepikaचे 7 Bikini Look

Deepika Padukon Bikini Look : ऋतिक रोशन आणि दीपिका पदूकोन यांची प्रमुख भूमिका असलेला फायटर चित्रपटातील दुसरं गाणं 22 डिसेंबरला प्रदर्शित झालं. पठाणनंतर दीपिका या गाण्यात पुन्हा एकदा बिकनी लूकमध्ये दिसली आहे. दीपिकाचा बिकनी लूक सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

Dec 22, 2023, 20:28 PM IST
1/8

फायटर चित्रपटातील दुसरं गाणं 22 डिसेंबरला प्रदर्शित झालं. या गाण्यात ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकान समुद्रकिनारी रोमान्स करताना दिसत आहेत. या गाण्यात दीपिकाने ब्लॅक मोनोकिनी परिधान केली आहे. 

2/8

विशेष म्हणजे दीपिका आणि ऋतिक पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसले आहेत. फायटरच्या या गाण्याला विशाल-शेखने म्युझिक दिली असून त्यांनी या गाण्याला आवाजही दिला आहे. हे एक रोमँटिक साँग आहे.

3/8

ही पहिलीच वेळ नाही आधी दीपिका शाहरुख खानबरोबरच्या पठाण चित्रपटात बिकनी लूकमध्ये दिसली होती. तिने या गाण्यात केशरी रंगाची बिकनी परिधान केली होती. यावरुन देशात बराच वाद रंगला होता. 

4/8

दीपिकाने सर्वात आधी हाऊसफुल या चित्रपटात बिकनी परिधान केली होती. यात तीने आपली परफेक्ट बॉडी फ्लॉन्ट केली होती. 

5/8

रेस 2 या चित्रपटात दीपिकाने हरिव्या रंगाची मोनोकिनी परिधान केली होती. डोळ्यावर गॉगल लावून सनबाथ घेतानाचं हे दृष्य होतं.   

6/8

कॉकटेल चित्रपटातील या दृष्याने तर खळबळ उडवून दिली होती. या चित्रपटातील एक दृष्यात दीपिका समुद्रिकनारी रेड कलरच्या बिकनीत दिसली होती. 

7/8

दम मोरा दम या गाण्यात दीपिका पादुकोन पांढऱ्या रंगाच्या बिकनीत दिसली होती. हा चित्रपट फारसा चालला नाही. पण दीपिकाचं हे गाणं चांगलंच लोकप्रिय झालं होतं. 

8/8

ब्रेक के बाद या चित्रपटातही दीपिका पादुकोनने फ्लोरल बिकनी परिधान केली होती. दीपिकाचा हा लूक लोकांच्या चांगलाच पसंती पडला होता.