काजोल, रवीना, माधुरी बनली आई तर सलमान, अक्षय आणि शाहरुख आजही तरुण; त्यांचा या सुंदर अभिनेत्रीसोबत रोमान्स
Actors on Screen Romance with Young Actress: काजोल, तब्बू, माधुरी असे की रवीना...एक वेळ अशी होती की प्रत्येकांच्या दिलावर या अभिनेत्री राज करत होत्या. मात्र, आज या अभिनेत्री ऑन स्क्रीन आईच्या भूमिकेत दिसून येत आहेत. मात्र, शाहरुख खान, सलमान खान आणि अक्षय खन्ना पहिल्यापेक्षा अधिक स्मार्ट दिसत आहेत. ते आता बॉलिवूडमध्ये येणाऱ्या नवोदीत अभिनेत्रींसोबत रोमान्स करताना पाहायला मिळत आहेत.
1/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/10/07/527383-1357127-actor-with-young-actress-11.jpg)
Shahrukh Khan: : शाहरुख खानने 90 च्या दशकाच्या सुरुवातीला करिअरला सुरुवात केली होती. त्यामुळे तो 3 दशकांहून अधिक काळ इंडस्ट्रीत आहे. त्याच्यासोबत काम करणारी अभिनेत्री आजकाल आईच्या भूमिकेत दिसत आहे पण शाहरुख दिवसेंदिवस तरुण होत चालला आहे. कधी तो स्वतःहून अनेक वर्षांनी लहान असलेल्या दीपिकाच्या प्रेमात पडतात, तर कधी अनुष्का, कतरिनाच्या.
2/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/10/07/527380-1357128-actor-with-young-actress-21.jpg)
3/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/10/07/527379-1357129-actor-with-young-actress-31.jpg)
Salman Khan: जेव्हा सलमान खानने करिअरला सुरुवात केली तेव्हा तो 22 वर्षांचा होता. पण आज तो 56 वर्षांचा झाला आहे. त्याच्या काळातील अभिनेत्रींनी एकतर इंडस्ट्री सोडली आहे किंवा आई-बहिणीच्या भूमिका साकारत आहेत. पण सलमान असा आहे की कधी दिशा पटानी तर कधी करीना कपूर सोबत रोमान्स करताना दिसत आहे. आणि त्यांच्यातील वयाचे अंतर सांगायची गरज नाही.
4/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/10/07/527377-1357130-actor-with-young-actress-41.jpg)