2025 पासून EPFO संदर्भात 5 नवे नियम होणार लागू, कर्मचाऱ्यांना काय होणार फायदा?

New EPFO Rules From 1 January 2025: ईपीएफओने आपल्या सदस्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरणांमध्ये काही मोठे बदल जाहीर केले आहेत.

| Dec 30, 2024, 12:20 PM IST

EPFO New Rules: ईपीएफओने आपल्या सदस्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरणांमध्ये काही मोठे बदल जाहीर केले आहेत.

1/8

2025 पासून EPFO संदर्भात 5 नवे नियम होणार लागू, कर्मचाऱ्यांना काय होणार फायदा?

EPFO New Rules From 2025 Benifits For employee Marathi News

EPFO New Rules: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO चे देशभरात करोडो सदस्य आहेत. ईपीएफओने आपल्या सदस्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरणांमध्ये काही मोठे बदल जाहीर केले आहेत. यातील बहुतांश बदल नव्या वर्षापासून लागू होण्याची शक्यता आहे.

2/8

5 नवीन नियम

EPFO New Rules From 2025 Benifits For employee Marathi News

पीएफ खातेधारकांना अधिक सुविधा मिळवून देणे आणि त्यांच्या सेवानिवृत्ती निधीचे अधिक चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करण्यात मदत करणे हा यामागचा उद्देश आहे. या बदलांमुळे खासगी क्षेत्रातील कर्मचारी आणि सरकारी कर्मचारी दोघांनाही फायदा होणार आहे. या नवीन नियमांबद्दल जाणून घेऊया. पीएफ खात्यासाठी लागू होणारे 5 नवीन नियम जाणून घेऊया.

3/8

एटीएममधून पीएफ पैसे काढण्याची सुविधा

EPFO New Rules From 2025 Benifits For employee Marathi News

ईपीएसओ सदस्यांना सोयीस्कर व्हावे यासाठी EPFO ​​ने एटीएम कार्ड जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सदस्यांना 24/7 पैसे काढण्याची सुविधा मिळेल. ATM द्वारे पैसे काढण्याची सुविधा आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.

4/8

24 तास सुविधा

EPFO New Rules From 2025 Benifits For employee Marathi News

नवीन मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीनुसार, ग्राहक 24 तासात कधीही आपल्या खात्यातील पैसे सहजपणे पैसे काढू शकतील. यामुळे ग्राहकांचा बराच वेळही वाचणार आहे. सध्या त्यांना त्यांच्या बँक खात्यात पीएफचे पैसे मिळण्यासाठी साधारण 7 ते 10 दिवस वाट पाहावी लागत आहे.

5/8

कर्मचाऱ्याची योगदान मर्यादा

EPFO New Rules From 2025 Benifits For employee Marathi News

पुढील वर्षात कर्मचाऱ्यांच्या EPF अंशदान मर्यादेतील बदल होणार आहे. सध्या कर्मचारी दरमहा त्यांच्या मूळ पगाराच्या 12% EPF खात्यात योगदान देतात. कर्मचाऱ्यांना ईपीएफओने निश्चित केलेल्या 15,000 रुपयांऐवजी त्यांच्या वास्तविक पगाराच्या आधारावर योगदान देण्याच्या विचारात सरकार आहे.

6/8

निवृत्तीपर्यंत मोठा निधी

EPFO New Rules From 2025 Benifits For employee Marathi News

या धोरणाच्या अंमलबजावणीनंतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीपर्यंत मोठा निधी जमा करता येणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांना दरमहा अधिक निवृत्ती वेतन मिळू शकणार आहे.

7/8

EPFO IT प्रणाली अपग्रेड

EPFO New Rules From 2025 Benifits For employee Marathi News

EPFO त्याच्या IT पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करत आहे. ज्यामुळे PF दावेदार आणि लाभार्थी सहजपणे त्यांच्या ठेवी काढू शकतील. जून 2025 पर्यंत हे अपग्रेड पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. एकदा आयटी पायाभूत सुविधा अपग्रेड झाल्यानंतर सदस्यांचे दावे पूर्वीपेक्षा अधिक वेगाने निकाली काढले जातील. यामुळे पारदर्शकता वाढून फसवणुकीचे प्रकारही कमी होतील.

8/8

पेन्शन काढण्याची सोय

EPFO New Rules From 2025 Benifits For employee Marathi News

EPFO पेन्शनधारकांसाठी महत्त्वाचे बदल करत आहे. नवीन नियमानुसार, पेन्शनधारक कोणत्याही अतिरिक्त पडताळणीशिवाय देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शन काढू शकतील. यामुळे सभासदांचा वेळही वाचेल. कारण त्यांना कोणत्याही बँकेतून पेन्शन काढता येणार आहे.