मिस युनिव्हर्स पाकिस्तानचा किताब पटकावणारी एरिका रॉबिन का होणार चौकशी?

 मालदीवमध्ये 14 सप्टेंबरला मिस युनिव्हर्स पाकिस्तानचा किताब पटकावणारी एरिका रॉबिन वादाच्या भोव-यात सापडलीय. तिच्या कार्यक्रमाची चौकशी करण्याचे आदेश पाकिस्तान सरकारनं दिले आहेत. 

Sep 21, 2023, 23:28 PM IST

Miss Universe Pakistan Erica Robin : पाकिस्तानी मॉडेल एरिका रॉबिन हिनं मिस युनिव्हर्स पाकिस्तान ही स्पर्धा जिंकलीय. ती आता जगात प्रतिष्ठित असलेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत पाकिस्तानचं प्रतिनिधित्व करणार आहे. खरं तर पाकिस्तानसाठी ही अभिमनाची बाब म्हणायला हवी. मात्र घडलं भलतच. एरिकाचं कौतुक करण्याऐवजी पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर उल हक काकर यांनी तिची चौकशी लावली आहे.

1/8

मिस युनिव्हर्स पाकिस्तानचा किताब पटकावल्यानंतर तिनं पाकिस्तानी जनतेवर स्तुतीसुमनं उधळली होती. इतकच नाही तर आपल्याला जगाला पाकिस्तानचं सौंदर्य दाखवायचंय असंही म्हंटल होतं. मात्र, पाकिस्तानच्या पंतप्रधानांसह बहुतांश नेत्यांनी हे देशाविरूद्धचं षडयंत्र असल्याचं म्हंटलंय.  

2/8

नोव्हेंबरमध्ये साल्वाडोर इथं होणा-या मिस युनिव्हर्स स्पर्धेत ती सहभागी होणारं आहे. 

3/8

अलिकडेच मालदिवमध्ये पार पडलेल्या स्पर्धेत सहभागी होत तिनं मिस युनिव्हर्स पाकिस्तानचा किताब पटकावला.

4/8

मॉडेलिंगमध्ये येण्यापूर्वी एरिकाने असिस्टंट मॅनेजर म्हणूनही काम केलं होतं. 

5/8

तिला पाकिस्तानच्या दिवा मॅगझिनमध्ये स्थान मिळालेय. 

6/8

24 वर्षीय एरिका रॉबिन ही ख्रिश्चन धर्मिय आहे. 2020 मध्ये एरिकानं मॉडेलिंगला सुरूवात केली.

7/8

मालदीवमध्ये पार पडलेली ही स्पर्धा दुबईच्या युजीन ग्रुपने आयोजित केली होती. याच गटाने बहारीन आणि इजिप्तमध्येही हा कार्यक्रम आयोजित केला होता. 

8/8

पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर उल हक काकर यांनी तिची चौकशी लावलीय आणि यामागचं कारण आहे कट्टरपंथियांकडून एरिकाला होत असलेला विरोध.