चांद्रयान 3 पोहचण्याआधीच चंद्रावर जमीन खरेदीचे व्यवहार सुरु; चंद्राचा मालक कोण?

सध्या चद्रांवर जमीन खरेदी करण्याच्या व्यवहारांची जोरदार चर्चा सुरु आहे. जाणून घ्या यामागची सत्यता. 

Aug 13, 2023, 22:55 PM IST

Land on Moon:  भारताचे चांद्रयान 3 चंद्रावर पोहचण्याआधीच चंद्रावर जमीन खरेदीचे व्यवहार सुरु झाले आहेत. एक कंपनी चंद्रावर जमीन विकण्याचा दावा करते. चंद्रावर जमीन खरेदी करण्याची प्रक्रिया काय आहे? किंमत किती आहे. या व्यवहारात फसवणूक होवू शकते का? चंद्राचा मालक कोण आहे? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. 

 

1/7

भारताचे चांद्रयान 3 हे 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. त्याआधीच  चंद्रावर जमीन खरेदीचे व्यवहार चर्चेत आले आहेत. 

2/7

हिमाचल प्रदेशमधील हमीरपूर येथील रहिवासी असलेले वकिल अमित शर्मा यांनी त्यांच्या मुलीच्या 18 वाढदिवसानिमित्त भेट म्हणून थेट चंद्रावर जमीन खरेदी केली आहे. 

3/7

 इंटरनॅशनल लुनर लँड्स रजिस्ट्री आणि लूना सोसायटी इंटरनॅशनल या  कंपन्या चंद्रावर जमीन विकण्याचा दावा करत आहेत.  

4/7

जगभरातील अनेक बडे उद्योगपतीच नाही तर बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंह राजपूतनेही चंद्रावर जमीन खरेदी केली होती.

5/7

बे ऑफ रेनबो, लेक ऑफ ड्रीम, सी ऑफ वाफर्स, सी ऑफ क्लाउड्स अशी चंद्रावर विकल्या जाणाऱ्या जमीनीच्या भागांची नावे आहेत. 

6/7

Lunarregistry.com नुसार चंद्रावरील एका एकर जमिन खरेदी करण्यासाठी  37.50 डॉलर म्हणजेच भारतीय चलानुसार 3075 रुपये मोजावे लागतात. 

7/7

आऊटर स्पेस ट्रीटी 1967 नुसार अंतराळातील कोणत्याही ग्रह किंवा चंद्रावर कोणत्याही देशाचा किंवा व्यक्तीचा अधिकार नाही. चंद्रावर कोणत्याही देशाचा ध्वज फडकावला जाऊ शकतो. यामुळे कोणता एक देस अथवा कोणी एक व्यक्ती चंद्राचा मालक होऊ शकत नाही.