50 मीटर उंचीवरून कोसळणारा भंडारदरा येथील रंधा धबधबा; नेकलेस फॉल आकर्षित करतोय

भंडारदरा धरण परिसरात असलेला रंधा धबधबा अर्थात अम्ब्रेला फॉल पाहण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात मोठी गर्दी होते. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे भंडारदरा धरण परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे.   

Aug 13, 2023, 21:40 PM IST

Bhandardar Randha Waterfall : सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे महाराष्ट्रातील अनेक पर्यटन स्थळी पर्यटकांनी मोठी गर्दी पहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या पर्यटनाचे केंद्र असलेल्या भंडारदरा धरण परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी  झाली आहे.  अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण परिसरात रंधा धबधबा पर्यटकांना आकर्षित करत आहे. येथील नेकलेस फॉल या धबधब्याचे प्रमुख आकर्षण आहे. 

1/7

भंडारदरा धरण ओव्हर फ्लो झाला आहे. यामुळे रंधा धबधबा परिसराचे निसर्ग सौंदर्य आणखी खुलले आहे. 

2/7

रंधा धबधबा हा पुणे शहरापासून 156 किलोमीटर, तर मुंबईपासून 177 किलोमीटर अंतरावर आहे.

3/7

 रंधा धबधबा हा निसर्गाचा विलक्षण आविष्कार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील  भंडारदऱ्यापासून  सुमारे 10 किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे.

4/7

प्रवरा नदीच्या डोंगररांमधून हा धबधबा  50 मीटर उंचीवरून कोसळतो. येथील नेकलेस फॉल हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. 

5/7

नगर पुणे मार्गे येणाऱ्या पर्यटकांसाठी वाकी फाटा मार्गे भंडारदरा धरणावर पोहचावे लागत आहे.  पर्यटकांचं मुख्य आकर्षणाचा केंद्र असलेल्या रंधा फॉल ठिकाणी या एकेरी वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. 

6/7

भंडारदरा धरण परिसरात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांसाठी विशेष नियमावली बनवण्यात आली आहे. भंडारदरा धरण क्षेत्रातील अनेक रस्त्यांवर एकेरी वाहतूक करण्यात आली आहे.  

7/7

हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांना सुरक्षित सोय केली आहे. मात्र, पर्यटक सुरक्षा कठडे ओलांडून येथे सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत आहेत.