Expensive Junk Food : जगभरातील सर्वात महागडं फूड; 4.5 लाखांचा बर्गर कधी खाल्लाय का?

बर्गर, पिझ्झा, पॉपकॉर्न तसंच आईसक्रिम खायला कोणाला आवडत नाही. आज आम्ही तुम्हाला असा खाण्याबद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमत लाखांमध्ये आहे. 

Jan 15, 2023, 20:34 PM IST
1/5

लोकांना जंक फूडपासून ते स्ट्रीट फूडपर्यंत क्रेझ दिसून येते. बहुतेक सर्वांनाच जंक फूड खायला आवडतं. पण आज आम्ही तुम्हाला जगातील अशाच काही पदार्थांबद्दल माहिती देणार आहोत, ज्यासाठी तुम्हाला लाखो रूपयांची साठवण करावी लागणार आहे.

2/5

आपल्यापैकी अनेकांना पिझ्झा खायला आवडतो. जगातील सर्वात महागडा पिझ्झा खायचा असेल तर तुम्हाला न्यूयॉर्कचं तिकीट काढावं लागेल. इथल्या पिझ्झाची किंमत 1.5 लाख रुपये असून त्याचं नाव जिनियस वर्ल्ड रेकॉर्ड 24 कॅरेट असं आहे. 

3/5

अमेरिकेच्या शिकागोमध्ये बर्को रेस्टॉरंटच्या पॉपकॉर्नची किंमत लाखोंमध्ये आहे. या ठिकाणी 6.5 गॅलन टिनची किंमत 1,87,855 रुपये आहे. हे पॉपकॉर्न 24 कॅरेट सोन्याचे आहेत.  

4/5

तुम्ही 4.50 लाखांच्या बर्गरबद्दल कधी ऐकलंय का? नेदरलँडमधील De Altons Voorthuizen या रेस्टॉरंटमध्ये The Golden Boy नावाचा बर्गर बनवला जातो, जो शेफ रॉबर्ट जे डी वीन बनवत असून त्यात सोनेरी पानांचा समावेश असतो.  

5/5

दुबईच्या स्कूपी कॅफेमध्ये 60 हजारांचं आईसक्रीम मिळतं. हे बनवण्यासाठी इराणमधून केशर आणि ब्लॅक ट्रफल आयात केलं जातं असून यावर 23 कॅरेट सोनं लावण्यात येतं