कोरोना काळात ऑगस्टमध्ये रत्न आणि दागिन्यांच्या निर्यातीत वाढ

कोरोना काळातही देशातून रत्न आणि दागिन्यांची निर्यात ऑगस्ट महिन्यात, जुलैच्या तुलनेत 29.18 टक्के वाढून 13,160.24 कोटी रुपयांवर पोहचली आहे. 

Sep 13, 2020, 15:14 PM IST

जुलै महिन्यात रत्न आणि दागिन्यांची 10,187.04 कोटींची निर्यात झाली होती. Gem and Jewellery Export Promotion Councilने ही माहिती दिली आहे.

 

1/5

अमेरिका, चीन, युरोप आणि इतर देशांकडून मागणी वाढल्याने रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीत  सुधारणा झाली आहे. 

2/5

या संपूर्ण वर्षात रत्न आणि दागिन्यांच्या निर्यातीत 38.84 टक्क्यांची घट झाली आहे. ऑगस्ट 2019 मध्ये ही निर्यात 21,518.73 कोटी रुपये इतकी होती. 

3/5

ऑगस्टमध्ये हिऱ्यांची निर्यात 22.16 टक्क्यांनी कमी होऊन 9,077.33 कोटी रुपये इतकी होती. तर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हीच निर्यात 11,661.03 कोटी रुपये होती. 

4/5

सोन्याच्या दागिन्यांची निर्यात ऑगस्टमध्ये 66.25 टक्क्यांनी घसरुन 2,335.22 कोटी रुपये इतकी होती. तर एक वर्षापूर्वी ऑगस्टमध्ये निर्यात 6,919.28 कोटी रुपये होती.

5/5

एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान हिरे-दागिन्यांची निर्यात 43.59 टक्क्यांनी कमी होऊन 45,189.76 कोटी रुपये आहे. 2019मध्ये याच महिन्यात निर्यातीचा आकडा 80,116.65 कोटी रुपये होता.