फॅक्ट चेक : जाणून घ्या कोरोना संदर्भात व्हायरल होणाऱ्या 'या' फोटोंमागचं सत्य

जाणून घ्या कोरोना संदर्भात व्हायरल होणाऱ्या 'या' फोटोंमागचं सत्य 

Mar 26, 2020, 13:49 PM IST

फॅक्ट चेक : जाणून घ्या कोरोना संदर्भात व्हायरल होणाऱ्या 'या' फोटोंमागचं सत्य 

 

कोरोना व्हायरसशी संपूर्ण जग एकजुटीनं लढा देत असतानाच सोशल मीडियावर व्हायरल होणारे काही फोटो आणि चर्चा अनेकांचं मन विचलित करुन जात आहेत. या चर्चांदरम्यानच प्रसिद्ध होणारे अनेक फोटो मन सुन्न करणारे आहेत. पण, मुळात या फोटोंचा कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाशी कोणताही संबंध नाही हीच दिलासादाक बाब आता समोर आली आहे. चला तर मग, तुम्हीही असेच काही फोटो पाहून काहीसे विचलीत झाला असाल तर त्या फोटोंमागचं सत्य जाणून घेऊया.... 

1/7

कोरोनावरील औषध-

दावा- कोरोना, कोविजड १९वर औषध मिळाल्याचा दावा अनेक ठिकाणी करण्यात आला होता.  सत्य- हे कोरोनावरील औषध नाही. तर, तपासणीचं किट आहे. 

2/7

डॉक्टर पती- पत्नीचा मृत्यू-

दावा- या जोडीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. १३४ रुग्णांवर उपचार केल्यानंतर त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं म्हटलं गेलं.  सत्य- ही फोटो कोणा डॉक्टर जोडीचा नाही. तर, विमानतळावरील एका जोडप्याचा आहे. 

3/7

इटलीमध्ये मृतहेद रस्त्यावर-

दावा- इटलीमध्ये कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे मृत पावलेल्यांचे मृतदेह रस्त्यावर असल्याचा हा फोटो. कोरोनाच्या भीतीने या मृतदेहांवर अंत्यसंस्कारही केला जात नसल्याची माहिती उघड झाली आहे.  सत्य- हा फोटो २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या काँटेजिअन या चित्रपटातील हे दृश्य 

4/7

रशियामध्ये रस्त्यावर सोडले सिंह-

दावा- रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांनी लॉकडाऊन करण्यासाठी म्हणून रस्त्यांवर ५०० सिंह सोडण्याचा आदेश दिला आहे.  सत्य- हे एका चित्रपटातील दृश्य आहे. 

5/7

एका पुस्तकात नमूद आहे कोरोनावरील उपाय-

दावा- डॉक्टर रमेश गुप्ता यांच्या एका पुस्तकात कोरोना व्हायरसच्या उपचाराविषयी लिहिण्यात आलं आहे.  सत्य- अद्यापही कोरोनावर परिणामकारक असा उपचार सापडलेला नाही. 

6/7

४९८रुपयांचा जिओचा मोफत रिचार्ज-

दावा- कोरोना व्हायरसच्या या कठीण प्रसंगामध्ये जिओ कंपनीकडून आपल्या ग्राहकांना ४९८ रुपयांचा मोफत रिचार्ज देण्यात आला आहे.  सत्य- जिओ कंपनीकडून असा कोणताही दावा करण्यात आलेला नाही. 

7/7

इटलीमधील ही थडगी....

दावा- इटलीमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे मृतदेह अशा प्रकारच्या असंख्य थडग्यांमध्ये ठेवण्यात आले आहेत.  सत्य- जवळपास सात वर्षांपूर्वीचा हा फोटो आहे. कोरोनाशी त्याचा कोणताही संबंध नाही.