UPSC मध्ये अपयश, 16 कोटींची संपत्ती... 32 वर्षीय भारतीय Stand Up Comedian चा थक्क करणारा प्रवास

Anubhav Singh Bassi : चित्रपटांमध्ये पदार्पण करणाऱ्या अनुभव सिंग बस्सीने ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक शो देखील केले आहेत. बस्सीकडे बंगला, कार, सर्व काही आहे. 2023 च्या अहवालानुसार, त्यांची एकूण संपत्ती सुमारे दोन मिलीयन म्हणजेच 16 कोटी असल्याचे म्हटले जात आहे.

Feb 02, 2023, 17:38 PM IST
1/7

anubhav singh bassi ranbir kapoor

रणबीर कपूरचा तू झुठी मैं मक्करचा या नवीन चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहेत. मात्र अनुभव सिंग बस्सी या स्टॅंडअप कॉमेडियनने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

2/7

anubhav singh bassi movie

या चित्रपटात अनुभव सिंग बस्सी रणबीरच्या मित्राची भूमिका साकारत आहे. इतर वेळी स्टॅंडपच्या माध्यमातून लोकांना हसवणारा अनुभव या चित्रपटातून अभिनेता म्हणून पदार्पण करणार आहे. 

3/7

anubhav singh bassi abroad tour

अनुभव सिंग बस्सी हे स्टँडअप कॉमेडीच्या जगातातील एक मोठे नाव बनले आहे. भारतातील सुमारे 35 शहरांमध्ये अनुभव सिंग बस्सीने आपली कला दाखवली आहे. तसेच त्याने विदेशातही शो केले आहेत.

4/7

anubhav singh bassi meerut

अनुभव हा उत्तर प्रदेशातील मेरठ शहराचा रहिवासी आहे. 9 जानेवारी 1991 रोजी जन्मलेल्या अनुभव सिंग बस्सीने 2015 मध्ये डॉ. राम मनोहर लोहिया नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमधून पदवी शिक्षण पूर्ण केले. बस्सीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचाही अभ्यास केला. मात्र तिथे त्याला यश आले नाही.

5/7

anubhav singh bassi business

त्यानंतर अनुभवने व्यवसायात उतरण्याचे ठरवले. मात्र त्यातही त्याला फारसे यश आले नाही. शेवटी त्याने आपली आवड जपण्याचे ठरवत स्टॅंडअप जगात पाऊल ठेवले. त्याचा निर्णय योग्य होता हे अनुभवला आता मिळालेल्या प्रसिद्धीवरुन दिसत आहे.

6/7

anubhav singh bassi stand up

2017 मध्ये, अनुभवने त्याच्या स्टँड-अप कॉमेडियन करिअरला सुरुवात केली. त्याच्या पहिल्याच ओपन माइक परफॉर्मन्सला 200 दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिले. 

7/7

anubhav singh bassi youtube

अनुभव बस्सीचे स्वतःचे YouTube चॅनेल देखील आहे, ज्यावर त्याचे तीस लाखांहून अधिक सबस्क्राईबर आहेत.  इंस्टाग्रामवर त्याचे दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. बस्सीचे चीटिंग, वॅक्सिंग आणि हॉस्टेल कॉमेडीच्या व्हिडिओंना आजही पसंतीने पाहिलं जाते. (All Photo Credit: Instagram)