महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण जिथं तुम्हाला मनशांती मिळेल; नाशिकमधील 'हे' धार्मिक पर्यटन स्थळ जगभर प्रसिद्ध

buddha purnima 2024 : आयुष्यात एकदा तरी धम्मगिरी  विपश्यना केंद्राला आवार्जून भेट द्या. इथं आल्यावर मनात सकारत्मकता निर्माण होते. 

| May 22, 2024, 18:20 PM IST

Nashik Dhamma Giri Vipassana International Academy : सध्या प्रत्येक जण चिंताग्रस्त दिसत आहे. दैनंदिन जीवनाच्या गडबडीत काही क्षण   मनशांती मिळावी असे प्रत्येकालाच वाटते. मनशांती पाहिजे असेल तर नाशिकमधील धम्मगिरी विपश्यना केंद्राला नक्की भेट द्या. हे जगातील सर्वात मोठे विपश्यना केंद्र आहे. जगभरातून हजारो लोक येथे मेडिटेशन करण्यासाठी येतात. 

 

1/7

महाष्ट्रातील नाशिकजवळ धम्मगिरी नावाचे विपश्यना केंद्र आहे. 

2/7

धम्मगिरी विपश्यना केंद्र नाशिक पासून अवघ्या 45 किलोमीटर अंतरावर तर मुंबईपासून 136 किलोमीटर अंतरावर आहे. 

3/7

दहा दिवसांच्या विपश्यना शिबीरात सहभागी होण्यासाठी  विपश्यना केंद्राच्या अधिकृत वेबसाईटवरुन नोंदणी करावी लागते.

4/7

 दहा दिवसांच्या विपश्यना शिबीरात एकाग्रता आणि मानसिक शांती मिळते.

5/7

 हा दहा दिवसांचा विपश्यना अभ्यासक्रम तुमचं आयुष्य बदलेल.

6/7

या केंद्रात दहा दिवसांचा मेडिटेशन अर्थात विपश्यना अभ्यासक्रम शिकवला जातो.  

7/7

धम्मगिरी हे जगातील सर्वात मोठ्या विपश्यना ध्यान केंद्रांपैकी एक आहे.