फॅशन शो, अवॉर्ड किंवा कोणत्याही समारंभावेळी 'रेड कार्पेट'च का वापरतात?

Red Carpet importance : रेड कार्पेटवर सेलिब्रिटी मंडळी येतात, एकाहून एक सरस पोझ देतात. समोर असणारे पापाराझी या कलाकारांचे असंख्य फोटो टीपतात. रेड कार्पेट म्हटलं की हे असंच वातावरण पाहायला मिळतं.   

Nov 24, 2023, 14:49 PM IST

Red Carpet importance : एखादा पुरस्कार सोहळा, एखादा मोठा समारंभ किंवा एखादा फॅशन शो... सगळीकडेच आपल्यासा रेड कार्पेट दिसतं. ऑस्कर असो, फिल्मफेअर असो किंवा मग कान्स... समारंभ कोणताही असो, सोहळा कोणताही असो. तिथं काही गोष्टी 100 टक्के दिसतात. त्यातलीच एक म्हणजे रेड कार्पेट. 

1/7

रेड कार्पेट

fashion show to award shows what is the importance of Red Carpet

मुळात रेड कार्पेटचा संबंध कायमच काही खास व्यक्तींशी येतो असं का? फक्त सेलिब्रिटीच नव्हे, तर एखादी खास व्यक्ती येणार असल्यासही रेड कार्पेट टाकलं जातं.   

2/7

कार्पेटचा रंग

fashion show to award shows what is the importance of Red Carpet

या कार्पेटचा रंग कधीच काळा, निळा किंवा पिवळा नसतो. पण असं का? तुम्हाला कधी पडलाय काह हा प्रश्न? या प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्हासा यूनानी नाटक अगामेमनॉनमध्ये डोकावावं लागेल.   

3/7

राजे- महाराजांसाठी हे रेड कार्पेट

fashion show to award shows what is the importance of Red Carpet

बीबीसीच्या एका लेखामध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार अल्बर्ट म्यूजियमच्या क्युरेटर सॉनेट स्टॅनफिल यांच्या मते राजे- महाराजांसाठी हे रेड कार्पेट वापरलं जातं. 

4/7

थेट अमेरिकेशी संबंध

fashion show to award shows what is the importance of Red Carpet

1821 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेम्स मनरो जेव्हा कॅलिफोर्नियातील जॉर्जटाऊन शहरात पोहोचले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठीसुद्धा रेड कार्पेट अंथरण्यात आलं होतं.

5/7

कलाकारांसाठी खास सोय

fashion show to award shows what is the importance of Red Carpet

1922 मध्ये  'रॉबिन हुड' चित्रपटाच्या प्रिमियरसाठी इजिप्शियन थिएटरसमोर एक लांबलचक कालीनवजा कार्पेट अंथरण्यात आलं होतं. ज्यानंतर तिथं कलाकरांचं सुरेख संचलन पाहायला मिळालं. 

6/7

..आणि रेड कार्पेटचा वापर सुरुच झाला

fashion show to award shows what is the importance of Red Carpet

पहिल्यांदाच पार पडलेल्या अकॅडमी पुरस्कार सोहळ्यासाठीसुद्धा रेड कार्पेटचा वापर करण्यात आला होता. ज्यानंतर ही संकल्पना सातत्यानं अशा सोहळ्यांसाठी वापरात आणली जाऊ लागली.   

7/7

किंग जॉर्जसाठी हे रेड कार्पेट

fashion show to award shows what is the importance of Red Carpet

भारतात या रेड कार्पेटचा वापर पहिल्यांदा केव्हा झाला याचा स्पष्ट उल्लेख आढळत नाही. पण, 1911 मध्य पहिल्यांदाच दिल्ली दरबारमध्ये रेड कार्पेट वापरण्यात आल्याचं म्हटलं गेलं. तत्कालीन वॉयसरॉय लॉर्ड हार्डिंगेनं किंग जॉर्जसाठी हे रेड कार्पेट अंथरण्यात आलं होतं.