Father’s Day ला तुम्ही 'या' Top भेट वस्तू वडिलांना देऊ शकता !

आज Father’s Day. आपल्या आवडत्या बाबाला काय भेटवस्तू द्यायची असा तुम्ही विचार करत असाल तर, तुमच्यासाठी या काही टिप्स. बाबा हे मुलींचे पहिले प्रेम तर मुलांचे सुपरहिरो  असतात. बाबा घरासोबत आपल्या कुटुंबातील सर्वांची काळजी घेत असता. तीही कोणतीही तक्रार न करता. प्रत्येक बाप हा वटवृक्षासारखा असतो, ज्याला घरातील प्रत्येक सदस्य फांदीप्रमाणे जोडलेला असतो. असा या बाबाला तुम्हाला काही भेटवस्तू द्यायची आहे का? वडिलांसाठी वाढदिवसाची भेटवस्तू खरेदी करणे असो किंवा त्यांना सहज भेट देणे असो, तुम्ही आपल्या आवडत्या बाबाला कोणत्या भेटवस्तू देऊ शकता त्याचे सर्वोत्तम पर्याय कोणते ते जाणून घ्या.

| Jun 18, 2023, 10:10 AM IST
1/9

तुमच्या वडिलांना चहा आणि कॉफी आवडत असेल तर तुम्ही त्यांना कॉफी मग भेटवस्तू म्हणून देऊ शकता. कॉफी मग ही एक अशी गोष्ट आहे जी मेणबत्ती म्हणून आणि पॅन होल्डर म्हणून वापरली जाऊ शकते. विशेषत: जर त्यावर बाबासाठी विशेष संदेश लिहिताही येतो. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी ‘सुपरहिरो बाबा’ला असा कॉफी मग भेट द्या.

2/9

Father's day  :  सुंदर शो पीस देखील घेऊ शकता. ग्रामोफोनसारखा दिसणारा हा शो पीस खूपच सुंदर आणि प्राचीन आहे. हे तुमच्या बाबाच्या ऑफिसचे डेस्क किंवा अभ्यासाचे टेबल सुशोभित करु शकते. ही एक सुंदर आणि स्वस्त अशी भेट आहे.

3/9

Father's day  :  बाबाला भेटवस्तू देण्याचा विचार करत असाल तर मोबाईल फोन कव्हर हा देखील एक चांगला पर्याय आहे. लेदर फ्लिप कव्हर्स मोबाईलला उत्कृष्ट लुक देऊ शकतात तसेच ते खराब होण्यापासून वाचवू शकतात. तुमच्या वडिलांचा फोन नवीन नसेल, पण हे नवीन कव्हर त्यांच्या फोनला नवा लूक देऊ शकेल.

4/9

Father's day  :  तुमच्या बाबांना भेट म्हणून ट्रिमर देखील घेऊ शकता. मीटिंग, पार्टी किंवा इतर कोणत्याही कामासाठी बाहेर जाण्याआधी त्यांना दाढी करायची गरज पडली तर ते हा ट्रिमर घरी सहज वापरु शकतात. 

5/9

Father's day  :  बाबासोबत घालवलेले अविस्मरणीय क्षण लाकडात कोरुन त्यांना भेट देऊ शकता. फोटोसोबत तुम्ही त्यात तुमच्या बाबांसाठी एक छानसा संदेशही लिहू शकता. लाकडात कोरलेल्या फोटोमुळे तो खूप आकर्षक दिसतो आणि घराची शोभाही वाढवतो.

6/9

Father's day  :  बाबाला वाचण्याची आवड असेल तर एखादे चांगले पुस्तकही भेट देऊ शकता. किंवा आता ऑनलाईन बुकही खरेदी करु शकता. तुमच्या बाबाला भेट म्हणून किंडल खरेदी करु शकता. त्याच्या लायब्ररीत अनेक पुस्तके आहेत, जी डाउनलोड करुन वाचता येतात. कोणत्याही टॅब किंवा मोबाईलप्रमाणेच तुम्ही ते बॅगेत टाकून कुठेही सहज नेऊ शकता.  

7/9

Father's day  :  बाबा घरासाठी आणि कुटुंबासाठी कष्ट उपसत असतो. बाबासाठी एक्यूप्रेशर चप्पल भेट देऊ शकता. ही चप्पल रक्ताभिसरण सुधारण्यास आणि पायातील वेदना दूर करण्यास मदत करु शकते. ही चप्पल घातल्याने बाबांचा थकवा कमी होऊ शकतो. तुम्ही हे गिफ्ट करुन  बाबाचा थकवा दूर करु शकता.

8/9

Father's day  :  बाबासाठी तांब्याचे भांडेही गिफ्ट करु शकता. (उदा. ग्लास, तांब्या किंवा बॉटल) Copper हे उष्णता शोषून घेत आणि आयुर्वेदात पण तांब्याच्या वस्तूमधील पाणी पिणे आपल्या शरीरासाठी चांगले मानले जाते. आहे.

9/9

Father's day  :  आपल्या  बाबाला काय आवडते, हे आपल्याला माहित असते. मात्र, वॉलेट अर्थात पैशाचे पाकिट हे बाबाची जिव्हाळ्याची गोष्ट असते. त्यामुळे वॉलेट ही बाबांसाठी चांगली भेट ठरु शकते. जवळजवळ प्रत्येकाच्या वडिलांना एक सवय असते की ते आपले पाकीट पटकन बदलत नाहीत. अशा परिस्थितीत मुलाने भेट दिलेले पाकीट घेण्यास तुम्ही नकार देऊ शकणार नाही. हे पाकीट आकर्षक तसेच किफायतशीर आहे.