मटकीप्रमाणंच बनवा मोड आलेल्या मेथीदाण्याची भाजी; महिलांसाठी ठरेल वरदान

मोड आलेल्या मेथीचे दाण्याचं सेवन स्त्रियांच्या अनेक व्याधींवर रामबाण उपाय आहे. 

Jul 17, 2024, 14:17 PM IST

चवीला कडू असले तरी मेथीचे लाडू शरीराला फायदेशीर ठरतात. म्हणूनच  रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याासाठी मेथीचे लाडू किंवा मेथीच्या भाजीचं सेवन करावं असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.

1/10

अनेक शारीरिक व्याधींवर मेथी गुणकारी आहे. डोळ्यांच्या आरोग्यासाठी मेथीची भाजी फायदेशीर ठरते. त्याचबरोबर  बद्धकोष्ठता आणि पोट साफ न होण्याच्या समस्येवर मेथीची भाजी खाणं हा रामबाण उपाय आहे.   

2/10

याचबरोबर मोड आलेल्या मेथीचे दाणे खाणं देखील आरोग्यवर्धक मानलं जातं. मोड आलेल्या मेथीचे दाणे महिलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. 

3/10

काही स्त्रिया स्त्रियांच्या स्तनांचा आकार लहान असतो, त्यामुळे बऱ्याचदा या स्त्रियांना नैराश्य देखील येतं. स्तनांचा आकार लहान असण्याला हार्मोनल बदल जबाबदार असतात. 

4/10

याशिवाय तुमचं  वजन जर कमी असेल तरी देखील स्तन लहान दिसतात. म्हणून मोड आलेल्या मेथीचे दाणे खाणं यावर फायदेशीर उपाय मानला जातो.   

5/10

दररोज सकाळी मोड आलेल्या मेथीचे दाणे खाल्ल्याने स्तनांचा आकार वाढण्यास मदत होते.   

6/10

मासिकपाळीवर फायदेशीर

मोड आलेल्या मेथीच्य़ा दाण्यांमध्ये एंटी-इंफ्लेमेटरी गुण आढळतात. त्यामुळे पाळीमध्ये ओटीपोटात दुखण्यावर आराम पडतो.   

7/10

बऱ्याच जणींना अतिरिक्त रक्तस्त्राव होतो, त्यामुळे रक्ताची  कमतरता जाणवते. मेथीच्या दाण्यात आयर्नची मात्रा मुबलक असते, त्यामुळे हिमोग्लोबीन वाढायला मदत होते. 

8/10

स्तनपान करण्यास फायदेशीर

बाळाच्या आरोग्यासाठी आईचं दूध गुणकारी मानलं जातं. काही स्त्रियांना प्रसूतीनंतरही अपेक्षेप्रमाणं बाळाला स्तनपान करता येत नाही, अशा वेळी जर मोड आलेल्या मेथीच्या दाण्यांचं सेवन केलं तर याचा सकारात्मक फायदा होतो.

9/10

केस आणि त्वचा

पावसाळ्यात आणि थंडीत वातावरणात गारवा असल्याने त्वचा आणि केस कोरडे पडणं, कोंडा होणं या समस्य़ा उद्भवतात. त्यामुळे केसगळती जास्त होते. 

10/10

मेथीमध्ये विटामिन सी आणि अँटीऑक्सिडेंट्स भरपूर असतात. यामुळे केसांना आणि त्वचेला पोषकतत्वं मिळतात.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)