महाराष्ट्राला आज मिळणार पहिली 'महिला महाराष्ट्र केसरी'; प्रतीक्षा आणि वैष्णवीमध्ये अंतिम लढत

Women Maharashtra Kesari: महाराष्ट्राची पहिली महिला महाराष्ट्र केसरी कोण? होणार याकडे आता सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.सांगलीतल्या जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी या स्पर्धा गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहेत.

Mar 24, 2023, 13:22 PM IST

Women Maharashtra Kesari: सांगलीमध्ये 'महिला महाराष्ट्र केसरी' स्पर्धेचा अंतिम सामना आज (शुक्रवारी) सायंकाळी 5 वाजता होणार आहे. राज्यात पहिल्यांदाच महिलांच्या राज्यस्तरीय "महाराष्ट्र केसरी"स्पर्धा सांगली मध्ये पार पडत आहेत.

1/6

Maharashtra Kesari Competition

सांगलीमधल्या जिल्हा क्रीडा संकुल मिरज इथे राज्यात पहिल्यांदाच होत असलेल्या महिलांच्या राज्यस्तरीय "महाराष्ट्र केसरी"स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

2/6

women wrestling final

या कुस्ती स्पर्धेमध्ये राज्यातील 45 महिला संघातील 450 महिला कुस्ती मल्ल सहभागी झाले आहेत. गुरुवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना आज सायंकाळी 5 वाजता होणार आहे.   

3/6

women wrestling award

या स्पर्धेत बाजी मारणाऱ्या विजेत्या महिला मल्लास चांदीची गदा आणि महिला महाराष्ट्र केसरी हा बहुमान देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे पहिल्या वाहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेची गदा कोण पटकविणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

4/6

final match Pratiksha Bagde vs Vaishnavi Patil

सांगलीच्या प्रतीक्षा आणि कल्याणची वैष्णवी यांच्यात होणार महिला महाराष्ट्र केसरीसाठी अंतिम लढत

5/6

Pratiksha Bagde vs Vaishnavi Patil

पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धाचेची अंतिम लढत ही सांगलीची प्रतीक्षा बागडे आणि कल्याणची वैष्णवी पाटील या दोघांमध्ये होणार आहे

6/6

Women Maharashtra Kesari Tournament

दुसरीकडे मात्र कुस्ती स्पर्धेच्या ठिकाणी अत्यंत ढिसाळ नियोजन पाहायला मिळाले आहे. स्पर्धेच्या ठिकाणी स्ट्रीट लाईट चालू नसल्याने अंधारातून वाट काढावी लागत आहे. तर पिण्याची पाण्याचीही व्यवस्था नसल्याचे पाहायला मिळत आहे.