And it’s official! प्रेयसीसह थाटामाटात पार पडला राणाचा साखरपुडा

May 21, 2020, 21:46 PM IST
1/5

And it’s official! प्रेयसीसह थाटामाटात पार पडला राणाचा साखरपुडा

देशभरात लॉकडाऊनचं संकट आणि तणावाचं वातावरण असतानाच कलाविश्वात मात्र कुठे आगामी चित्रपटांच्या तयारीसाठी खटाटोप सुरु आहे, तर कुठे चक्क लग्नसराईचे वारे वाहू लागले आहेत. 'बाहुबली' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर खलनायकी भूमिकेतून अधिराज्य गाजवणाऱ्या 'भल्लालदेव' म्हणजेच अभिनेता राणा डग्गुबती यानं काही दिवसांपूर्वीच त्याच्या वैयक्तिक जीवनातील अत्यंत महत्त्वाची आणि तितकीच आनंदाची बातमी सर्वांना सांगितली. 

2/5

And it’s official! प्रेयसीसह थाटामाटात पार पडला राणाचा साखरपुडा

मिहिका बजाज हिच्यासोबतच्या नात्याला राणाने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून एक नवं नाव दिलं होत. 

3/5

And it’s official! प्रेयसीसह थाटामाटात पार पडला राणाचा साखरपुडा

राणा आणि मिहीकाचं हेच नातं आता एका वेगळ्य़ा टप्प्यावर आलं आहे. जिथून अवघ्या काही अंतरावरच त्यांच्या सहजीवनाचा प्रवासही सुरु होणार आहे. कारण, अतिशय सुरेख अशा छोटेखानी पण तितक्याच थाटामाटात पार पडलेल्या सोहळ्यात राणा आणि मिहीकाचा साखरपुडा पार पडला आहे. 

4/5

And it’s official! प्रेयसीसह थाटामाटात पार पडला राणाचा साखरपुडा

खुद्द राणाने सोशल मीडियावर And it’s official!, असं लिहित या सोहळ्यातील काही फोटो शेअर केले. ज्यामध्ये ही सेलिब्रिटी जोडी अतिशय. आनंदात दिसत आहे.   

5/5

And it’s official! प्रेयसीसह थाटामाटात पार पडला राणाचा साखरपुडा

पारंपरिक वेशभूषेत राणा आणि मिहीका एकमेकांना शोभून दिसत आहेत. त्यांच्या साखरपुड्याचं वृत्त माध्यमांमध्ये आणि चाहत्यांच्या वर्तुळात प्रसिद्ध होताच अनेकांनीच या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव केला. (सर्व छायाचित्रे- सोशल मीडिया)