रत्नागिरी-रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पूरस्थिती गंभीर (पाहा फोटो)

रत्नागिरी-रायगड जिल्ह्यात पाऊस दोन दिवसांपासून कोसळतोय. अनेक ठिकाणी पूरस्थिती गंभीर झाली आहे.

Aug 05, 2020, 15:04 PM IST

रत्नागिरी-रायगड जिल्ह्यात पाऊस दोन दिवसांपासून कोसळतोय. अनेक ठिकाणी पूरस्थिती गंभीर झाली आहे.

1/7

रत्नागिरी जिल्ह्यात अती मुसळधार पाऊस कोसळत आहे. राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण आणि खेड येथे पुराचा धोका वाढला आहे. संगमेश्वरमधील बावनदी पुलावर पुराचे पाणी आल्याने मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली आहे.

2/7

रायगडमधील सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून महाड शहरात पाणी घुसल्याने १०० हून अधिक नागरिकांना स्थलांतरीत करावे लागले. 

3/7

रायगडमधील सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून महाड शहरात पाणी घुसल्याने भीतीचे वातावरण आहे. 

4/7

रायगडमधील महाड शहरात पुराचे पाणी घुसले आहे. सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून शहरात पाणी दोन दिवसांपासून आहे.

5/7

रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असून नद्या दुथडी वाहत असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. आजुबाजूच्या परिसरात पाणी घुसले आहे.

6/7

रायगड जिल्ह्यातही जोरदार पाऊस असून नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. रायगड येथे मुंबई गोवा महामार्ग ठप्प झाला असून माणगावजवळ घोडनदीला पूर आलाय. 

7/7

रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. नद्या दुथडी वाहत असून पूरस्थिती निर्माण झाली आहे.