आसाम आणि बिहारमध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत

Jul 23, 2020, 14:59 PM IST
1/5

बिहारमध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. नेपाळमध्ये होणाऱ्या संततधार पावसामुळे बिहारच्या नद्यांना पूर आला आहे. हजारो जीव धोक्यात आले आहेत. सहरसा, दरभंगा, मधुबनी, सुपौल, मुझफ्फरपूर, मोतीहारी आणि पलामू या भागात पूर आला आहे.

2/5

पलामू येथील 18 प्रवाशांना घेऊन जाणारी कार पूर पाण्यात पलटी झाली. मलय धरणातून सतत पाणी सोडले जात होते. धरणाशेजारी असलेल्या पुलावर हे वाहन उलटले  

3/5

आसाममध्ये निसर्गाचं रौद्र रुप दिसत आहे. 25 जिल्ह्यात सुमारे 88 लोकांचा मृत्यू झाला आहे. 25 लाख लोकांना घरे सोडून रस्त्यावर बांधलेल्या तात्पुरत्या निवारामध्ये आश्रय घ्यावा लागला आहे. ब्रह्मपुत्र नदीला पूर आला आहे. जवळपास संपूर्ण आसामला महापूरला सामोरे जावे लागत आहे

4/5

आसाममधील गोलपारामध्ये 5 लाख 58 हजार, बरपेटामध्ये 3 लाख 52 हजार, मोरीगांमध्ये 3 लाख 14 हजार, धुबरीमध्ये दोन लाख 77 हजार आणि साउथ सालमारामध्ये 1 लाख 80 हजार लोकांना पुराचा फटका बसला आहे.

5/5

गावांमध्ये आठ फुटांपर्यंत पाणी आहे. काजीरंगा नॅशनल पार्क देखील पाण्याखाली जात आहे. अनेक प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. चिरांग जिल्ह्यातील अनेक गावं ही पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त होत आहे.