साखरपुडा झाल्याचं कळवत अभिनेत्यानं दिला आश्चर्याचा धक्का!

Jul 23, 2020, 12:37 PM IST
1/5

साखरपुडा झाल्याचं कळवत अभिनेत्यानं दिला आश्चर्याचा धक्का!

कोरोना व्हायरसमुळं लॉकडाऊन लागू केल्यानंतर अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. काही कार्यक्रमांच्या तारखा बदलण्यात आल्या. पण, आता मात्र देशातील बहुतांश भागांमध्ये अनलॉकचे विविध टप्पे सुरु झाले असल्यामुळे काही निर्बंध शिथील करण्यात येत असल्याचं दिसत आहे. परिणामी, आता काही कौटुंबीक कार्यक्रम आणि सोहळ्यांचीही आता काही प्रमाणात रेलचेल पाहायला मिळत आहे. अशाच एका कार्यक्रमांच्या गर्दीत एका लोकप्रिय अभिनेत्यानं त्याच्या प्रेयसीसह 

2/5

साखरपुडा झाल्याचं कळवत अभिनेत्यानं दिला आश्चर्याचा धक्का!

दाक्षिणात्य कलाविश्वात आपली ओळक प्रस्थापित करणारा हा अभिनेता आहे नितीन. त्यानं एक सोशल मीडिया पोस्ट करत आपल्या साखरपुडा सोहळ्यादरम्यानच्या फोटोसह चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली

3/5

साखरपुडा झाल्याचं कळवत अभिनेत्यानं दिला आश्चर्याचा धक्का!

Shalini Kandukuri शालिनीसह एक सुरेख फोटो त्यानं पोस्ट केल्याचं पाहत चाहत्यांनीही कमेंट बॉक्समध्ये या जोडीला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. 

4/5

साखरपुडा झाल्याचं कळवत अभिनेत्यानं दिला आश्चर्याचा धक्का!

नितीन आणि शालिनी येत्या काही दिवसांमध्ये म्हणजेच २६ जुलै २०२० ला विवाहबंधनात अडकणार असल्याचंही म्हटलं जात आहे. त्यामुळं चाहत्यांसाठी नक्कीच ही आणखी एक आनंदाची बाब असेल. 

5/5

साखरपुडा झाल्याचं कळवत अभिनेत्यानं दिला आश्चर्याचा धक्का!

अतिशय मोजक्या पाहुण्याच्याच उपस्थिती त्यांचा विवाहसोहळा पार पडणार असल्याचं म्हटलं जात आहे. शिवाय यादरम्यान, सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचं काटेकोरपणे पालनही केलं जाणार असल्याचं कळत आहे. (सर्व छायाचित्रे- सोशल मीडिया)