Mpox Preventions: या' गोष्टी पाळा आणि मंकीपॉक्स टाळा, महामारीपासून रहा सुरक्षित

Monkeypox Precautions: जगात आता सर्वत्र मंकीपॉक्सचा धोका संभवतोय. अशात मंकीपॉक्सचा संसर्ग होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे आहे.

Aug 18, 2024, 12:13 PM IST

मंकीपॉक्स हा एक विषाणूजन्य आजार आहे जो मंकीपॉक्स नावाच्या विषाणूमुळे होतो. हा ऑर्थोपॉक्स विषाणू वंशातील एक प्रजाती. सर्व प्रथम 1958 साली संशोधनासाठी ठेवलेल्या माकडांमध्ये मंकीपॉक्स आढळून आला होता. याचा पहिला रूग्ण एक 9 महिन्याचा मुलगा होता. मंकीपॉक्सचे जगभरातील  थैमान आणि WHO ने दिलेले इशारा लक्षात घेता मंकीपॉक्सचा संसर्ग होऊ नये याची काळजी घ्यायला हवी. जाणून घेऊया काय केल्याने तुम्ही मंकीपॉक्सपासून सुरक्षित राहू शकतात.

1/6

हात धुत राहणे

कळत-नकळत संक्रमित व्यक्ती किंवा प्राण्याला स्पर्श केल्यानंतर हात धुवावे किंवा सॅनिटाइझ करावे. मंकीपॉक्स हा स्पर्शातून पसरणारा आजार आहे. 

2/6

संपर्क टाळा

मंकीपॉक्स असलेल्या व्यक्तीने वापरलेल्या वस्तू हाताळू नका. मंकीपॉक्स व्हायरस हा उंदिर आणि इतर काही प्राण्यांमुळे माणसाच्या शरीरात प्रवेश करतो.   

3/6

लस घ्या

तुम्ही पात्र असल्यास, संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर चार दिवसांच्या आत मंकीपॉक्स विरूद्ध लस घ्या. 

4/6

स्वच्छता राखा आणि निर्जंतुकीकरण करा

घरात कोणी येऊन गेल्यानंतर किंवा इतर वेळी सातत्याने निर्जंतुकीकरण करत रहा. सर्वत्र स्वच्छता राखा.

5/6

संक्रमित व्यक्तींना वेगळे ठेवा

लक्षणे आढळलेल्या व्यक्तींना त्यांच्या त्वचेवरील जखम पूर्ण बरी होईपर्यंत इतरांपासून वेगळे ठेवा. तुम्ही मंकीपॉक्स असलेल्या एखाद्या व्यक्तीची काळजी घेत असाल, तर संरक्षणात्मक काळजी घ्या. PPE कीट, ग्लोव्हस् वापरा. तोंड, नाक, डोळ्यांचे संरक्षण करा.

6/6

प्रत्यक्ष संपर्क टाळा

मंकीपॉक्सची लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींशी किंवा प्राण्यांशी प्रत्यक्ष संपर्क टाळा. संसर्ग झालेल्या व्यक्ती सोबत कोणत्याही प्रकारचे शारीरिक ठेऊ नका.