Chanakya Niti: 'या' 3 गोष्टी केल्यानंतर लगेच स्नान करावे, अन्यथा...

आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात अनेक विविध प्रकारच्या लोकांसह मानवी जीवनातील गोष्टी सांगितल्या आहेत. 

| Aug 18, 2024, 12:10 PM IST
1/6

आचार्य चाणक्य

आचार्य चाणक्य हे भारतातील विद्वान व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांनी नीतिशास्त्रात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. 

2/6

स्नान करावे

आचार्य चाणक्य म्हणतात की, कोणती कामे केल्यावर माणसाने लवकरात लवकर स्नान करावे, अन्यथा त्यांचे शरीर अपवित्र राहते. 

3/6

स्मशानभूमी

स्मशानभूमीत गेल्यावर तिथून परतल्यावर लगेच स्नान करावे, कारण स्मशानभूमीत चिता जळत असताना त्यातून निघणारा धूर तुमच्या शरीराला स्पर्श करतो. त्यामुळे तेथून परतल्यावर लगेच आंघोळ करावी. 

4/6

केस कापल्यानंतर

चाणक्य यांच्या मते, केस कापल्यानंतर व्यक्तीने लगेच स्नान केले पाहिजे. कारण जे लोक केस कापल्यानंतर आंघोळ करत नाहीत. त्यांचे शरीर अशुद्ध राहते. 

5/6

अनेक समस्या

तसेच लहान कापलेले केस अंगावर चिकटून राहिल्याने खाज सुटणे, काटे येणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. 

6/6

मसाज

चाणक्य म्हणतात की, तेलाने शरीराची मालिश केली असेल तर तुम्ही आंघोळ करावी. कारण शरीराला तेलाने मसाज केल्यानंतर आंघोळ केल्याने तुमचे शरीर स्वच्छ होतेच पण शरीरातील चिकटपणाही दूर होतो.