6 परदेशी क्रिकेटपटू ज्यांनी भारतीय महिलांशी केलंय लग्न

Apr 22, 2020, 13:42 PM IST
1/5

मुथैया मुरलीधरन आणि मधिमलार राममूर्ती

मुथैया मुरलीधरन आणि मधिमलार राममूर्ती

श्रीलंकेचा क्रिकेटर आणि शानदार स्पिन बॉलर मुथैया मुरलीधरनला संपूर्ण जग ओळखतं. त्याने 21 मार्च 2005 ला एका भारतीय मुलीसोबत लग्न केलं होतं. मधिमलार यांचे वडील चेन्नईमधील मलार रुग्णालयाचे फाउंडर आहेत.

2/5

शोएब मलिक आणि सानिया मिर्जा

शोएब मलिक आणि सानिया मिर्जा

शोएब मलिक आणि सानिया मिर्जा यांचा विवाह काही दिवस चर्चेचा विषय ठरला होता. भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध अजूनही चांगले नाहीत. अशा परिस्थितीत या दोघांनी लग्नाचा निर्णय़ घेतला होता. पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक भारतीय टेनिस खेळाडू सानिया मिर्जा सोबत 2010 मध्ये विवाह केला आहे. दोघांना एक मुलगा ही आहे.

3/5

जहीर अब्बास आणि रिता लूथरा

जहीर अब्बास आणि रिता लूथरा

पाकिस्तानचे माजी फलंदाज ज़हीर अब्बास यांची भारतीय असलेल्या रिता लूथरा यांच्यासोबत 1980 मध्ये युकेमध्ये पहिली भेट झाली होती. 8 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 1988 मध्य त्यांनी विवाह केला. लग्नानंतर रिटा यांनी इस्लाम धर्म स्विकारला होता.

4/5

ग्लेन टर्नर आणि सुखिंदर कौर

ग्लेन टर्नर आणि सुखिंदर कौर

ग्लेन टर्नर याचं नाव न्यूझीलंडचा शानदार खेळाडूमध्ये घेतलं जातं. ग्लेनने 1973 मध्ये भारतीय असलेल्या सुखिंदर कौरसोबत विवाह केला होता.

5/5

माइक ब्रेयरली आणि माना साराभाई

माइक ब्रेयरली आणि माना साराभाई

क्रिकेटच्या इतिहासात सर्वात चांगल्या कर्णधारांमध्ये ज्याचं नाव येतं त्या माइक ब्रेयरलीने भारतीय असलेल्या माना साराभाई सोबत विवाह केला आहे.  माइक आणि माना यांची भेट 1976 मध्ये भारताच्या इंग्लंड दौऱ्यात झाली होती. माना साराभाई प्रसिद्ध उद्योगपती गौतम साराभाई यांची मुलगी आहे. त्यानंतर ते इंग्लंडला स्थायिक झाले.