नर्गिस ते संजय दत्त; कर्करोगाशी दत्त कुटुंबाची झुंज

Aug 12, 2020, 15:27 PM IST
1/5

नर्गिस ते संजय दत्त; कर्करोगाशी दत्त कुटुंबाची झुंज

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याला फुफ्फुसाचा कॅन्सर असल्याचं निदान झालं आणि चाहत्यांच्या काळजात कालवाकालव झाली. स्टेज ३ मध्ये असताना त्याच्या या आजाराचं निदान झालं असून, येत्या काळात उपचारासाठी तो अमेरिकेला रवाना होणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

2/5

नर्गिस ते संजय दत्त; कर्करोगाशी दत्त कुटुंबाची झुंज

आपलं आजारपण आणि त्यातून सावरण्यासाठीचा कालावधी पाहता खुद्द संजूबाबानंच एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून आपण येत्या काही काळासाठी कामातून विश्रांती घेत असल्याचं स्पष्ट केलं. 

3/5

नर्गिस ते संजय दत्त; कर्करोगाशी दत्त कुटुंबाची झुंज

कॅन्सरशी झुंज देण्याची दत्त कुटुंबाची ही पहिलीच वेळ नाही. तत्कालीन आघाडीच्या अभिनेत्री आणि संजूबाबाची आई, अभिनेत्री नर्गिस यांनाही कॅन्सरची लागण झाली होती. याच आजारामुळं त्यांचा मृत्यूही झाला होता. संजय दत्तच्या कारकिर्दीची सुरुवात होणार इतक्यातच त्याच्या आईचं निधन झालं. हे दु:ख तो आजपर्यंत विसरु शकलेला नाही. 

4/5

नर्गिस ते संजय दत्त; कर्करोगाशी दत्त कुटुंबाची झुंज

संजय दत्तचे वडील, म्हणजेच अभिनेता सुनील दत्त यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता. 

5/5

नर्गिस ते संजय दत्त; कर्करोगाशी दत्त कुटुंबाची झुंज

सध्याच्या घडीला संजूबाबाला कॅन्सरचं निदान झालेलं असतानाच, त्याचं कुटुंब लॉकडाऊनमुळं दुबईमध्ये असल्याचं कळत आहे. असं असलं तरीही ते संजयच्या संपर्कात असून, आताच्या या प्रसंगी त्याला धीर देण्याचं काम करत आहेत.