24 तासात 16 वेळा सूर्योदय आणि 16 सूर्यास्त ! कुठं आहे हे अनोखं ठिकाण?

अंतराळात एका दिवसात 16 वेळा सूर्योदय आणि 16 वेळा सूर्यास्त होतो.

| Jun 11, 2024, 21:14 PM IST

 International Space Station : अंतराळात एका दिवसात 16 वेळा सूर्योदय आणि 16 वेळा सूर्यास्त होतो. International Space Station वर कार्यरत असलेले अंतराळवीर हा विलक्षण अनुभव  घेतात. जाणून घेवूया अंतराळात 16 सूर्योदय, 16 सूर्यास्त का होतात.

1/7

पृथ्वीवर एक दिवस 24 तासांचा असतो.  या दरम्यान एकदा सूर्यास्त आणि सूर्योदय होतो.

2/7

International Space Station पृथ्वीभोवती 16 वेळा फिरत असल्याने अंतराळवीर 16 वेळा सूर्योदय आणि 16 वेळा सूर्यास्त पहायला मिळतो.

3/7

 International Space Station  45 मिनिटे सूर्यप्रकाशात आणि 45 मिनिटे अंधारात असते. 

4/7

International Space Station  पृथ्वीभोवती सुमारे 90 मिनिटांत एक प्रदक्षिणा पूर्ण करते.  

5/7

अंतराळात तरंगत असलेले International Space Station ताशी 27 हजार किमी वेगाने पृथ्वीभोवती फिरत आहे.

6/7

International Space Station वर कार्यरत असलेले अंतराळवीर रोज 16 सूर्योदय, 16 सूर्यास्त अनुभवतात.  

7/7

International Space Station अंतराळात पृथ्वीभोवती सुमारे 400 किमी उंचीवर लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत आहे.