Ganeshostav 2024: मुंबईतील 7 भव्य गणेशोत्सव मंडळं; यंदा इथं नक्की भेट द्या

गणेशोत्सवाची सुरुवात यंदा शनिवारी 7 सप्टेंबरला होणार आहे.  घरगुती गणेशोत्सवांप्रमाणेच सार्वजनिक गणेशोत्सवदेखील तितक्याच उत्साहात साजरे केले जातात. मुंबईत अशी काही गणेशमंडळं आहेत जी भव्य गणेश मूर्ती आणि आकर्षक देखाव्यांसाठी ओळखले जातात. जाणून घेऊया मुंबईतील प्रमुख 'पाच' गणेशमंडळ ज्यांना तुम्ही नक्कीच भेट द्यायला हवी.

Sep 04, 2024, 16:20 PM IST

गणेशोत्सवाची सुरुवात यंदा शनिवारी 7 सप्टेंबरला होणार आहे.  घरगुती गणेशोत्सवांप्रमाणेच सार्वजनिक गणेशोत्सवदेखील तितक्याच उत्साहात साजरे केले जातात. मुंबईत अशी काही गणेशमंडळं आहेत जी भव्य गणेश मूर्ती आणि आकर्षक देखाव्यांसाठी ओळखले जातात. जाणून घेऊया मुंबईतील प्रमुख 'पाच' गणेशमंडळ ज्यांना तुम्ही नक्कीच भेट द्यायला हवी.

 

1/7

लालबागचा राजा

'नवसाला पावणारा गणपती' म्हणून लालबागच्या राजाची ख्याती आहे. लालबागच्या राजाची स्थापना मुळात कोळी बांधवांनी केलेल्या नवसातून 1934 साली झाली. यंदा मंडळाचं 91 वं वर्ष आहे. जनसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत बाप्पाच दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी करतात.   

2/7

राजा तेजुकायाचा

लालबागचा राजा, गणेशगल्ली, चिंतामणी गणेशगल्लीप्रमाणेच तेजुकायाचा राजासुद्धा प्रसिद्ध आहे. या राजाला 2 कोटींहून जास्त किंमतीच सोन घातलं जातं. या मंडळाची पर्यावरणपूरक गणेशमूर्ती पर्यावरणपूरक आणि आकर्षक असते.   

3/7

केशवजी नाईक चाळ, गिरगाव

मुंबईमधील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव गिरगावमधील केशवजी नाईक चाळीत सुरु झाला. या उत्सवात गणेशाला मोठ्या मूर्तीच स्वरुप न देता घरगुती गणपतींप्रमाणे हा उत्सव साजरा केला जातो. या सार्वजनिक गणेशोत्सवाला 130 हून अधिक वर्षे झाली आहेत.   

4/7

परळचा राजा

  परळचा राजा या मंडळाच यंदाच 78 व वर्ष आहे. यावर्षी मंडळ जेजुरीच्या खंडोबाच्या स्वरूपातील गणेशमूर्ती स्थापन करणार आहे. 

5/7

मुंबईचा राजा, गणेशगल्ली

गणेशगल्लीमधील मुंबईचा राजा लालबागमधील सर्वात जुनं आणि मानाचं गणेशमंडळ आहे. 1928 मध्ये गणेशगल्लीतील मुंबईच्या राजाची स्थापना झाली. दरवर्षी एखादा विशिष्ट विषय ठरवून बाप्पाचा देखावा साकारला जातो. यावर्षी उज्जैनमधील श्री महाकालेश्वर मंदिर साकारल जाणार आहे.   

6/7

जी एस बी सेवा मंडळ गणपती

जी एस बी सेवा मंडळाचा गणपती पाच दिवसांचा असतो. मुंबईतील वडाळामधील द्वारकानाथ भवनात या बाप्पाच्या उत्सवाच आयोजन केलं जातं. मुंबईतील सर्वात 'श्रीमंत गणपती' अशी या बाप्पाची ओळख आहे.या गणपतीला फक्त सोन्याच्या दागिन्यांनी मढवलं जातं.    

7/7

चिंचपोकळीचा चिंतामणी

चिंचपोकळीच्या चिंतामणी मंडळाची स्थापना 1920 साली स्वातंत्र्य हेच ध्येय या प्रेरणेने भारावलेल्या तरुणांनी केली. 'ध्यानी मनी, चिंतामणी' म्हणत चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दरबारात श्रद्धेने येणाऱ्यांची संख्या वर्षानुवर्षे वाढतच आहे. यावर्षी बाप्पाची प्रभावळ विशेष लक्ष वेधून घेत आहे. प्रभावळीवर जगन्नाथपुरी येथील श्रीकृष्ण, बलराम आणि सुभद्रा यांच्या प्रतिकृती आहेत.