पौराणिक कथाः गणपतीची स्त्री रूपातही केली जाते पूजा, आईच्या संरक्षणासाठी बाप्पा झाला विनायकी

गणेशोत्सवासाठी अवघा एक दिवस उरला आहे. महाराष्ट्रात बाप्पाचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले जाते. राज्यात गणेशोत्सव हा खूप मोठा उत्सव मानला जातो. शहरातली बाप्पाच्या मूर्ती पाहण्यासाठी अलोट गर्दी करतात. 

| Sep 06, 2024, 12:45 PM IST

गणेशोत्सवासाठी अवघा एक दिवस उरला आहे. महाराष्ट्रात बाप्पाचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले जाते. राज्यात गणेशोत्सव हा खूप मोठा उत्सव मानला जातो. शहरातली बाप्पाच्या मूर्ती पाहण्यासाठी अलोट गर्दी करतात. 

1/8

पौराणिक कथाः गणपतीची स्त्री रूपातही केली जाते पूजा, आईच्या संरक्षणासाठी बाप्पा झाला विनायकी

ganeshotsav 2024 vinayaki female avatar of ganesha know the history in marathi

सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात महाराष्ट्रात सर्वप्रथम लोकमान्य टिळकांनी सुरू केली. तेव्हापासून आजतागायत मोठ्या धामधुमीत बाप्पाचे स्वागत केले जाते. सार्वजनिक गणेशोत्सवाचे आकर्षण म्हणजे देखावा आणि बाप्पाची विविध स्वरुपातील मूर्ती. पण अलीकडेच बाप्पाची एक स्त्रीवेषातील मूर्ती चर्चेत आली होती. 

2/8

ganeshotsav 2024 vinayaki female avatar of ganesha know the history in marathi

बाप्पाच्या या स्त्री रुपाला विनायकी असं म्हणतात. माता पार्वती देवीसाठी बाप्पाने विनायकी अवतार धारण केल्याची कथा पुराणात आढळते. यामागची कथा आज आपण जाणून घेऊया. 

3/8

ganeshotsav 2024 vinayaki female avatar of ganesha know the history in marathi

विनायकी, गणेशीनी, गजानिनी या नावाने गणेशाच्या स्त्री रुपाबद्दल माहिती सापडते. मत्स्यपुराणात गणेशाच्या विनायकी अवताराबद्दल उल्लेख सापडतो. यामागे एक कथाही सांगितली जाते. 

4/8

ganeshotsav 2024 vinayaki female avatar of ganesha know the history in marathi

अंधकासूर नावाचा एक राक्षस होता. ब्रह्मदेवाने दिलेल्या वरदानामुळं जमिनीवर पडणाऱ्या रक्ताच्या एकेक थेंबानुसार तितकेच असूर निर्माण होती. हाच अंधकासूर देवी पार्वतीच्या रूपावर मोहित झाला. त्याने देवींशी विवाह करण्याचा प्रस्ताव पाठवला. 

5/8

ganeshotsav 2024 vinayaki female avatar of ganesha know the history in marathi

अंधकासुराचे इतके साहस पाहून देवी पार्वतींनी महादेवांना सांगितले. तेव्हा शिवशंकराने त्रिशुळाने अंधकाचा वध केला. मात्र त्याचे रक्त जमिनीवर सांडताच अनेक अंधकासूर निर्माण झाले. त्यामुळं देवतांना प्रश्न पडला की अंधकासूराचा वध कसा करायचा. 

6/8

ganeshotsav 2024 vinayaki female avatar of ganesha know the history in marathi

अंधकासुराचा वध करताना त्याच्या रक्ताचा एकही थेंब जमिनीवर पडायला नको, तेव्हाच त्याचा वध होईल, असं सल्ला देवी पार्वतींनी दिला होता. तेव्हा ब्रह्मा, विष्णु, इंद्र यांनी त्यांच्यातील स्त्री शक्तीची अराधना केली. विष्णुची योगमाया, ब्रह्मची ब्राह्मी, इंद्रा इंद्राणी रुपात प्रगट झाले. त्याचवेळी गणेशाची विनायकी किंवा गणेशीनी शक्तीदेखील प्रकटली. 

7/8

ganeshotsav 2024 vinayaki female avatar of ganesha know the history in marathi

असं म्हणतात की, गणेशीनीने आपल्या सोंडेने अंधकासुराचे रक्त प्राशन केले. अशा प्रकारे अंधकासुराचा वध झाला. थानुमलायन मंदिरात आजही गणेशाची ही रक्षात्मक स्वरुपाची मूर्ती स्थापित आहे.

8/8

ganeshotsav 2024 vinayaki female avatar of ganesha know the history in marathi

मध्य प्रदेशातील जबलपूर येथे भेडाघाट भागात १० व्या शतकातील चौसष्ट योगिनी मंदिर आहे. या मंदिरात ४१ व्या योगिनीच्या रुपात विनायकी आढळते. या मंदिरात विनायकीला 'अंगिनी' म्हणून ओळखले जाते. भारतात अनेक ठिकाणी गणेशाचे ही स्त्री रूपातील मूर्त्या आढळतात.