PHOTO : अमिताभसोबत काम करायला आवडत नाही, K अक्षराशी आहे खास संबंध; तर अंडरवर्ल्डशी पंगा घेणारा 'तो' आहे कोण?

Entertainment : बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डमध्ये नेहमीच एक विचित्र कनेक्शन राहिलंय. बॉलिवूड चित्रपटांचा बंपर व्यवसाय नेहमीच गुंडांना आकर्षित करतो. एक काळ असा होता की हिट चित्रपटांच्या निर्मात्यांकडून डॉन आपला हिस्सा थेट गोळा करत असतं. पैसा दिली नाही तर उघड गोळीबार केल्याच्या अनेक घटनाही घडल्या. असाच काहीसा प्रकार एका सुपरस्टार अभिनेत्यासोबत घडला.

| Sep 06, 2024, 10:39 AM IST
1/9

अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत ज्यांनी आपल्या करिअरची सुरुवात अभिनयाने केली. नंतर इतर दिग्दर्शनाच्या क्षेत्राकडे वळले. आम्ही बोलत आहोत 70-80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक राकेश रोशन म्हणजेच हृतिक रोशनच्या वडिलांबद्दल. अभिनय आणि दिग्दर्शनाच्या दुनियेत आपला ठसा उमटवला. राकेश रोशन आज 75 वर्षांचे झाले आहेत. त्यांचा जोम इतका होता की त्यांनी कॅन्सरलाही पराभूत केले आणि आजही ते तरुणपणापेक्षा अधिक तरूण आणि चैतन्यशील आहेत. 

2/9

त्यांनी आपल्या मुलाला 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये शानदार एन्ट्री दिली. हा चित्रपट केवळ बंपर हिट ठरला नाही तर बॉक्स ऑफिसवरही भरपूर कमाई केली. या चित्रपटाने हृतिक आणि अमिषा पटेल यांच्या करिअरला चांगली सुरुवात केली.

3/9

हृतिक रोशनला या चित्रपटाचे यश साजरेही करता आलं नव्हतं, जेव्हा एका अपघाताने त्याना इतका हादरवून सोडलं की ते त्याच्या अभिनय कारकिर्दीला पूर्णविराम देण्याचा विचार करू लागले होतं. कारण चित्रपटाचे दिग्दर्शक आणि हृतिकचं वडील राकेश रोशन यांना अंडरवर्ल्डकडून धमक्या आल्या होत्या. त्याला चित्रपटाच्या नफ्यात वाटा देण्यास सांगितलं होतं. राकेश रोशनने तसे करण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर खुलेआम गोळीबार करण्यात आला.

4/9

घर घर की कहानी, पराया धन, आँख मिचोली, खूबसूरत, एक कुंवरी एक कुंवर, मन मंदिर आणि खेल खेल में यासह अनेक चित्रपटांमध्ये त्यांची अभिनयाची जादू पाहिला मिळाली. 1987 हे वर्ष होते जेव्हा त्यांनी दिग्दर्शक म्हणून त्यांचा पहिला चित्रपट 'खुदगर्ज' दिग्दर्शित केला होता. त्यानंतर त्याने 'किंग अंकल', करण अर्जुन, कोयला यांसारख्या चित्रपटांमधून बॉलिवूडला हिट चित्रपट देण्यास सुरुवात केली.

5/9

'खुदगर्ज' या चित्रपटात ते पहिल्यांदाच आपले नशीब आजमावत होता, अशा परिस्थितीत त्यांनी भगवान तिरुपतीच्या दरबारात जाऊन शपथ घेतली चित्रपट हिट झाला, तो आपले केस दान करेल. मात्र, ही इच्छा पूर्ण करण्याआधीच त्याचा आणखी एक 'खून भरी मांग' हा चित्रपट तयार झाला होता. या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान, जेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांना तिरुपती बालाजीच्या दरबारात केलेल्या नवसाची आठवण करून दिली, तेव्हा राकेश रोशन बालाजीच्या दरबारात पोहोचले आणि तेथे त्यांचे केस दान केलं. या चित्रपटात टक्कल असताना त्यांनी काम केलं. हा चित्रपटही हिट ठरला. खून भरी मांग'मध्ये राकेश रोशनने मुंडण केल्यानंतर आजपर्यंत त्यांना केस आले नाहीत. 

6/9

राकेश रोशनच्या चित्रपटांच्या नावांबाबत लोकांच्या मनात नेहमीच एक प्रश्न असतो की त्यांच्या बहुतेक हिट चित्रपटांची नावे 'के' अक्षराने का सुरू होतात. खरंतर, 1982 मध्ये त्यांनी 'कामचोर' हा चित्रपट बनवला, हा चित्रपट हिट ठरला. यानंतर तो 'जाग उठा इंसान' या चित्रपटात व्यस्त होता. हा चित्रपट फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. 'भगवान दादा' 1986 साली प्रदर्शित झाला आणि हा चित्रपटही आपली जादू चालवू शकला नाही.

7/9

'जाग उठा इंसान' चित्रपटादरम्यान एका चाहत्याने राकेश रोशनला पत्र लिहून आपल्या चित्रपटांचे नाव 'के' ठेवण्याचा सल्ला दिला होता. अशा परिस्थितीत 'भगवान दादा'च्या अपयशानंतर राकेश रोशन यांना या सूचनेचा विचार करावा लागला आणि 'खुदगर्ज' हा चित्रपट आला जो यशस्वी ठरला. त्यानंतर त्याने आपल्या बहुतेक सुपरहिट चित्रपटांची नावे 'के' ने ठेवण्यास सुरुवात केली.

8/9

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, 2000 मध्ये राकेश रोशनला आपल्या मुलाचे हृतिक रोशनचं करिअर घडविण्यासाठी 'कहो ना प्यार है' या चित्रपटासाठी त्यांनी घरसह कारही गहाण ठेवली होती. 

9/9

अमिताभ बच्चन आणि राकेश रोशन यांनी एकत्र कधीही काम केलं नाही. याबद्दल एका मुलाखतीत ते म्हणाले की, मी किंग अंकल अमिताभ बच्चन यांना डोळ्यासमोर ठेवून हा चित्रपट बनवला होता, त्यांच्याशी सर्व बोलणी फायनल झाली होती, मात्र शेवटच्या क्षणी अमिताभ यांनी काही अडचणींमुळे काम करण्यास नकार दिला होता. यानंतर मी जॅकी श्रॉफला चित्रपटात मुख्य भूमिका दिली. यानंतर दोघांनी कधीही एकत्र काम केलं नाही. पण त्यानंतर कधी काम करण्याची संधी आली नाही.