विराटसोबतच्या नात्याबाबत पहिल्यांदाच Gautam Gambhir ने केला खुलासा, म्हणतो 'काही गरज नाही...'

Gautam Gambhir On Virat Kohli : टीम इंडियाचे अॅग्रेसिव्ह खेळाडू म्हणून गौतम गंभीर आणि विराट कोहली यांना ओळखलं जातं. या दोन्ही खेळाडूंची मैदानात अनेकदा वाद देखील झाले आहेत.

| May 30, 2024, 19:09 PM IST
1/7

मैदानात राडा

मागील आयपीएल हंगामात गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात भर मैदानात राडा झाला होता. तर यंदाच्या आयपीएल हंगामात मात्र चित्र वेगळंच दिसलं.

2/7

विराट आणि गंभीर

यंदाच्या हंगामात विराट आणि गंभीर जेव्हा आमने सामने आले तेव्हा दोघांनी हात मिळवला आणि गळाभेट घेतली.

3/7

वाद मिटला ?

दोन्ही दिग्गज खेळाडूंचा वाद मिटला की काय? असा प्रश्न विचारला जातोय. अशातच आता गंभीरने दोघांच्या नात्यावर मोठं विधान केलंय.

4/7

कोहलीसोबत माझं नातं...

विराट कोहलीसोबत माझं नातं असं काही आहे, जे या देशाला माहित असणं आवश्यक नाही, असं म्हणत गंभीरने सणसणीत उत्तर दिलंय.

5/7

आम्हाला अधिकार

विराटला व्यक्त होण्याचा आणि आपल्या संबंधित संघांना विजय मिळवून देण्यासाठी मला जितका अधिकार आहे तितकाच त्याला देखील अधिकार आहे, असंही गंभीर म्हणतो.

6/7

मसाला

आमचा संबंध लोकांना मसाला देण्यासाठी नाही, असंही गौतम गंभीर विराट कोहलीवर बोलताना म्हणाला आहे.

7/7

एकाच म्यानात दोन तलवारी

दरम्यान, गौतम गंभीर टी-20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर टीम इंडियाचा प्रशिक्षक असेल अशी जोरदार चर्चा रंगलीये. त्यामुळे आता एकाच म्यानात दोन तलवारी कशा राहणार? असा सवाल विचारला जातोय.