Wedding Pics: जेनेलियाचा 'न्यू वेडिंग लुक' सोशल मीडियावर होतोय व्हायरल... पाहा फोटो

जेनेलिया आणि नवरी असलेली तिची मैत्रिण, यांची क्लोज बाँडिंग तिच्या फॅन्सला प्रचंड आवडत आहे. यांचे कॅन्डीड फोटोज व्हायरल होत आहेत.

Jun 05, 2022, 21:11 PM IST

Genelia D'Souza At Wedding : बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया डिसूझा देशमुखचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोयत. या फोटोंमध्ये जेनेलिया तिच्या मैत्रिणीच्या लग्नात खूप एन्जॉय करताना दिसत आहे. जेनेलिया आणि नवरी असलेली तिची मैत्रिण, यांची क्लोज बाँडिंग तिच्या फॅन्सला प्रचंड आवडत आहे आणि म्हणूनच की काय या दोघींचे फोटो चर्चेचा विषय ठरत आहेत.

 

1/5

जेनेलिया डिसूझा सध्या चित्रपटांपासून दूर असली तरी वैयक्तिक आयुष्याचा आनंद घेतानाच्या फोटोंमुळे मात्र ती नेहमीच चर्चेत असते. जेनेलिया जवळपास प्रत्येक इव्हेंटमध्ये आणि पार्ट्यांमध्ये हजेरी लावते, तसेच ती मित्रांसोबत वेळ घालवतानाही पाहायला मिळते.

2/5

 अलीकडेच जेनेलिया तिच्या एका मैत्रिणीच्या लग्नात गेली असताना, ती आपल्या सर्व फ्रेंड्स सोबत खूप एन्जॉय करताना पाहिली गेली आहे. मात्र, आपल्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या जेनेलियाला मात्र तिच्या स्वत:च्या मैत्रीणीने लूकमध्ये मागे टाकलं आहे.

3/5

लग्नात, जेनेलिया साध्या आणि सिंपल स्टाईलमध्ये पोहोचली होती. मात्र दुसरीकडे सर्वांच्या नजरा नवरीच्या सौंदर्यावर असल्याने ही नवरीबाई जेनेलियाच्या किल्लर लुकला मागे टाकत सर्वांसमोर भाव खाऊन गेली, असं नेटीझन्सला वाटतं आहे.

4/5

जेनेलिया सोशल मीडियावर खूप अॅक्टीव असते. जेनेलियाच आणि रितेशच्या रीलचे फॅनफॉलोइंग खूप मोठी आहे. जेनेलियाच्या इंस्टाग्रामवर एकापेक्षा एक फनी रील्स पाहायला मिळत असतात. जे चाहत्यांचे मनोरंजन करतात.

5/5

ही नववधू इतकी सुंदर दिसतीय की खुद्द जेनेलियाचीही तिच्या मैत्रिणीवरून नजर हटत नाहीय आणि तिने तिच्या मैत्रिणीला कोणाची ही नजर न लागण्यासाठी काळा टीक्का देखील लावला आहे.