रेल्वे स्थानकात राहायचंय? अवघ्या 100 रुपयांत मिळेल रूम, 'येथे' करा बुकींग

रेल्वेचा प्रवास खूप आरामदायी आहे. भारतीय रेल्वे प्रवाशांना अनेक सुविधा पुरवते. सण आणि उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये होणारी गर्दी आणि त्यांच्या सुविधा लक्षात घेऊन विशेष गाड्या चालवल्या जातात, त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळतो.

| Jul 01, 2023, 21:29 PM IST

IRCTC Retiering Room Booking: रेल्वेचा प्रवास खूप आरामदायी आहे. भारतीय रेल्वे प्रवाशांना अनेक सुविधा पुरवते. सण आणि उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये होणारी गर्दी आणि त्यांच्या सुविधा लक्षात घेऊन विशेष गाड्या चालवल्या जातात, त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळतो.

1/5

रेल्वेचा प्रवास खूप आरामदायी

Get a room at railway station for only 100 rupees follow steps for booking

IRCTC Retiering Room Booking: रेल्वेचा प्रवास खूप आरामदायी आहे. भारतीय रेल्वे प्रवाशांना अनेक सुविधा पुरवते. सण आणि उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये होणारी गर्दी आणि त्यांच्या सुविधा लक्षात घेऊन विशेष गाड्या चालवल्या जातात, त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळतो.

2/5

बहुतांश प्रवाशांना नसते माहिती

Get a room at railway station for only 100 rupees follow steps for booking

याशिवाय इतर सुविधाही दिल्या जातात. रेल्वे स्थानकावर राहण्याची सोय ही त्यापैकी एक सुविधा आहे. बहुतांश प्रवाशांना या सुविधेची माहिती नसते. त्यामुळे स्थानकाजवळ आजूबाजूच्या हॉटेल रुम्समध्ये चांगले भाडे देऊन मुक्काम केला जातो. 

3/5

रेल्वे स्टेशनवर अतिशय स्वस्त दरात रुम

Get a room at railway station for only 100 rupees follow steps for booking

जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल आणि तुम्हाला रेल्वे स्टेशनवरच राहावे लागत असेल तर तुम्हाला स्टेशनवरच एक खोली मिळेल. यासाठी हॉटेलमध्ये जाऊन रुमसाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही, कारण तुम्हाला रेल्वे स्टेशनवर अतिशय स्वस्त दरात रुम मिळतील.

4/5

हॉटेलसारखी खोली अगदी स्वस्त दरात

Get a room at railway station for only 100 rupees follow steps for booking

रेल्वे स्थानकावर प्रवाशांना राहण्यासाठी खोल्यांचीही व्यवस्था आहे. या एसी खोल्या आहेत आणि हॉटेलच्या खोलीप्रमाणेच तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी उपलब्ध असतील. एका रात्रीसाठी बुकिंगचे शुल्क 100 ते 700 रुपयांपर्यंत असू शकते. रेल्वे स्टेशनवर रूम बुक करण्यासाठी येथे स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. 

5/5

अशी करा बुकींग

Get a room at railway station for only 100 rupees follow steps for booking

सर्व प्रथम IRCTC खाते उघडा. यानंतर लॉगिन करा आणि My Booking च्या पर्यायावर जा. तुमच्या तिकीट बुकिंगच्या तळाशी 'रिटायरिंग रूम'चा पर्याय दिसेल. येथे क्लिक केल्यावर तुम्हाला रूम बुक करण्याचा पर्याय मिळेल. येथे तुम्हाला तुमची वैयक्तिक आणि प्रवासाची माहिती द्यावी लागेल. पेमेंट केल्यानंतर तुमची खोली बुक केली जाईल.