close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तू तुम्ही देखील घेऊ शकता

Sep 12, 2019, 16:19 PM IST
1/5

पंतप्रधान मोदींना मोठ्या संख्येने भेटवस्तू मिळतात. या भेटवस्तूंचा दुसऱ्यांदा लिलाव करण्यात येत आहे. लिलावात या भेटवस्तूंची किंमत २०० रुपयांपासून ते २ लाख ५० हजार रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे. गेल्या ६ महिन्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचे ई-ऑक्शन (e auction) करण्यात येणार आहे. 

2/5

या भेटवस्तूंची संख्या २ हजार ७७२ आहे. या भेटवस्तूंचे ई-ऑक्शन १४ सप्टेंबरपासून सुरु होणार असून ३ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे. केंद्रीय पर्यटन मंत्री प्रल्हाद पटेल यांनी आज औपचारिक उद्घाटन केलं. ई-ऑक्शनमध्ये भेटवस्तूंवर अधिकाधिक बोली लावणाऱ्याला ती भेटवस्तू देण्यात येईल.

3/5

दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींना मिळालेल्या या भेटवस्तूंचा लिलाव करण्यात येत आहे. भेटवस्तूंमधून मिळालेल्या पैशांचा उपयोग नमामि गंगे या प्रोजेक्टसाठी करण्यात येणार आहे.

4/5

या भेटवस्तूंमध्ये एक गणपतीची मूर्ती आहे. या मूर्तीची किंमत २०० रुपये ठेवण्यात आली आहे. तर बनारसच्या विणकरांद्वारा करण्यात आलेल्या एका पेटींगची किंमत २ लाख ५० हजार ठेवण्यात आली आहे. 

5/5

जानेवारी महिन्यात पंतप्रधानांना दिलेल्या भेटवस्तूंचा लिलाव करण्यात आला होता. आता दुसऱ्यांदा लिलाव करण्यात येत आहे.