घरातलं सोनं Dead Investment वाटतंय? मग हे वाचाच; 2516 कोटींचा मालक म्हणतो, 'भारतीय..'

Gold In Lockers Indian Women Connection Veteran investor Comment: सोनं घेऊन ठेवावं की नाही? याबद्दल भारतीयांमध्येच दोन गट दिसून येतात. मात्र जागतिक स्तरावरील नामांकित गुंतवणूकदाराने सोन्यातील गुंतवणुकीसंदर्भात भारतीय महिलांचा उल्लेख करत केलेलं विधान अनेकांनाचा आश्चर्याचा धक्का देणार आहे. या गुंतवणूकदाराने नेमकं काय म्हटलं आहे. सोनं ही डेड इनव्हेस्टमेंट आहे का? याचसंदर्भात जाणून घ्या...

| Sep 01, 2024, 15:51 PM IST
1/10

goldinindia

सोन्यातील गुंतवणुकीसंदर्भातील तुमचा पूर्ण दृष्टीकोनच या व्यक्तीचं म्हणणं वाचल्यानंतर बदलेल यात शंका नाही. जाणून घ्या कोण आहे ही व्यक्ती आणि तिने नक्की काय म्हटलंय भारतीय महिलांचा उल्लेख करत...

2/10

goldinindia

सोनं ही डेड इनव्हेसमेंट म्हणजेच फारसा परतावा न देणारी गुंतवणूक आहे का? या विषयावर मतमतांतरे आहेत. खास करुन भारतीयांमध्ये या पिवळ्या धातूचा वापर अधिक असून त्यामुळेच त्यामध्ये गुंतवणुकीचं प्रमाणही अधिक असतानाच सोन्यामधून परतावा किती मिळतो हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. मात्र भारतीयांच्या या सोन्यावरील प्रेमासंदर्भात जागतिक स्तरावरील एका दिग्गज गुंतवणूकदाराने केलेलं विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.  

3/10

goldinindia

प्रसिद्ध गुंतवणूकदार जीम रॉजर्स यांनी सोनं आणि चांदीसंदर्भात फार महत्त्वाचा धडा आपण भारतीय बाजारपेठेमधून घेतल्याचं म्हटलं आहे. सध्या सिंगापूरमध्ये वास्तव्यास असलेल्या जीम यांनी 'एनडीटीव्ही प्रॉफीट'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारतीय महिलांना सोन्यासंदर्भात असलेल्या ओढीमधून गुंतवणुकीसंदर्भात आयुष्यभराचा धडा मिळाल्याचं म्हटलं आहे.  

4/10

goldinindia

जीम हे 81 वर्षाचे असून या अमेरिकी अब्जाधीशाने, "मी भारतामधील बाजारांमध्ये फिरलो तेव्हा मला जाणवलं की भारतीय महिलांमध्ये सोनं आणि चांदीचे दागिणे वापरण्याचं प्रमाण फार जास्त आहे. या धातूंमध्ये गुंतवणूक एक उत्तम सौदा ठरु शकतो हे मी भारतीय महिलांकडून शिकलोय," असं सांगितलं.  

5/10

goldinindia

"मोठ्या प्रमाणात सोनं आणि चांदी असणं हे पैसे वाया गेल्यासारखं असल्याचं भारतात अनेकांचं म्हणणं असतं. पैशाचा योग्य वापर करण्याऐवजी हा चुकीचा वापर असल्याचं म्हणतात," यावर काय सांगाल असं जीम यांनी विचारण्यात आलं होतं.

6/10

goldinindia

जीम यांनी कपाटांमध्ये सोनं ठेवणं हा संपत्तीचा चुकीच्या पद्धतीने केलेला वापर असल्याची धारणा चुकीची असल्याचं म्हटलं आहे. तुमच्याकडे सोनं असेल तर आर्थिक संकटाच्या काळात तुमची मानसिकता सकारात्मक राहण्यासाठी त्याची मदत होते. अशा काळात तुमच्याकडे सोनं असेल तर तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित वाटतं. 

7/10

goldinindia

"सोन्यासंदर्भात भारतीयांचा आणि भारत सरकारचा दृष्टीकोन काय आहे मला ठाऊक आहे. मात्र जेव्हा आर्थिक संकट येतं तेव्हा तुमच्याकडे सोनं असेल तर तुम्हाला हायसं वाटतं. असं संकट येऊ नये अशी माझी अपेक्षा आहे. मात्र आलं तर आपल्याकडे थोडं सोनं, चांदी असेल तर अधिक सुरक्षित नक्कीच वाटतं," असं जीम यांनी सोनं डेड इनव्हेस्टमेंट नसल्याबद्दल भाष्य करताना म्हटलं.   

8/10

goldinindia

सध्या गुंतवणूक करताना स्वत: सोन्याकडे कसं पाहतो याबद्दल बोलताना जीम यांनी त्यांच्याकडे बऱ्याच काळापासून सोनं आणि चांदीमधून गुंतवणूक असल्याचं मान्य केलं. मात्र आता यामध्ये गुंतवणूक करत नसल्याचं ते म्हणाले. तरीही त्यांना सोन्यारपेक्षा सध्या चांदीमधील गुंतवणूक उत्तम वाटतेय.  

9/10

goldinindia

जीम हे 'बिनलॅण्ड इन्सट्रेस्ट'चे अध्यक्ष आहेत. तसेच ते 'क्वांटम फंड्स'चे सहसंस्थापक असून त्यांनी आणि जॉर्ज रोसोस यांनी एकत्रितपणे ही कंपनी सुरु केली आहे.  

10/10

goldinindia

जीम रॉजर्स यांनी एकूण संपत्ती सध्या 300 मिलियन अमेरिकी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 2516 कोटी 56 लाखांहून अधिक आहे.