तुर्कीमध्ये सापडली सोन्याची खाण, अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेपेक्षा अधिक किंमत

Dec 26, 2020, 13:46 PM IST
1/5

तुर्कीची वृत्तसंस्था Anadolu ने दिलेल्या माहितीनुसार, सोन्याचा ही खाण एका खत कंपनीने शोधून काढली आहे. या सोन्याची किंमत जवळपास 600 कोटीहून अधिक आहे.

2/5

सोन्याचा एवढा मोठा साठा मिळाल्याची बातमी समजताच तुर्कीच्या स्टॉक एक्सचेंज बोर्सा इस्तंबूलमध्ये Gubertas चे शेअर्स 10 टक्क्यांनी वधारले. यामुळे तुर्कीची अर्थव्यवस्था वाढणार आहे.

3/5

तुर्कीच्या मध्य-पश्चिम सोगुटमध्ये ही खाण सापडली आहे. कृषी पत सहकारी संस्थेचे प्रमुख फहारेटीन पोयराज यांनी तुर्की माध्यमांना याबाबत माहिती दिली आहे.

4/5

2020 मध्ये 38 टन सोन्याचे उत्पादन करून तुर्कीने आपला विक्रम आधीच मोडला आहे. ऊर्जामंत्री फेथ डोनेगेम यांनी सप्टेंबरपर्यंत वर्षाला 100 टन सोने उत्पादन करण्याचे लक्ष्य ठेवले होते. नवीन सोन्याच्या साठ्याचे मूल्य अनेक देशांच्या एकूण जीडीपीपेक्षा अधिक असेल असा अंदाज वर्तविला जात आहे.

5/5

वर्ल्डमीटरने दिलेल्या माहितीनुसार, मालदीवची जीडीपी $ 487 दशलक्ष तर बुरुंडीची 317 दशलक्ष डॉलर्स आहे. लायबेरियाची जीडीपी 329 दशलक्ष डॉलर्स आहे, भूतानची जीडीपी 253 दशलक्ष डॉलर्स आहे आणि लेसोथोची जीडीपी 258 दशलक्ष डॉलर्स इतकी आहे. या व्यतिरिक्त बार्बाडोस, गुयाना, मॉन्टेनेग्रो आणि मॉरिटानियाची अर्थव्यवस्थाही 600 दशलक्षपेक्षा कमी आहे.