Indian Railways : १ जानेवारीपासून रेल्वेचा प्रवास होणार चांगला, मिळणार या सुविधा

भारतीय रेल्वे १ जानेवारीपासून रेल्वे प्रवाशांच्या सुविधांबाबत अनेक गोष्टीवर लक्ष देत आहे.

Dec 26, 2020, 13:46 PM IST

भारतीय रेल्वे १ जानेवारीपासून रेल्वे प्रवाशांच्या सुविधांबाबत अनेक गोष्टीवर लक्ष देत आहे.

1/6

मुंबई : भारतीय रेल्वे १ जानेवारीपासून रेल्वेच्या प्रवाशांच्या सुविधांबाबत अनेक गोष्टीवर लक्ष देत आहे. त्यानुसार बदल करण्यावर भर देत आहे. काही मोठे बदल करण्यात येणार आहेत. यापैकी एक बदल आहे, साइड लोअर बर्थ Side Lower Berth) यांच्याबाबतीत. या नव्या बदलामुळे प्रवाशाला मोठा आराम मिळणार आहे. 

2/6

१ जानेवारी २०२१ पासून शान-ए-भोपाळ एक्सप्रेसमध्ये Linke Hofmann Busch  अर्थात LHB कोच असणार आहे. या कोचमध्ये लोअर बर्थ बिल्कुल नवीन असणार आहे. बाजूचा लोअर बर्थच्या मध्ये जागा असते. मात्र, दोन्ही सीट जोडल्या जाणार आहेत. त्यामुळे तुमचा प्रवास आरामदायी होणार आहे. दोन्ही सीटमधील गॅस असणार नाही. त्यामुळे रात्रीचा प्रवास आरामदायक वातावरण होणार आहे. कोचची निर्मितीसाठी जर्मनीची कंपनी दुवे हॉफमन बुशची मदत घेतलेली आहे.

3/6

'शान-ए-भोपाळ एक्सप्रेस' भोपाळ हबीबगंज स्टेशनवरून दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन दरम्यान चालू आहे. या ट्रेनसाठी ४५ कोच असणार आहेत, त्यापासून प्रत्येक रॅंकमध्ये २२ कोच लावले जातील. हे कोच जास्त सुविधांयुक्त असणार आहे. या कोचमधून प्रवास करताना प्रवाशाला समाधान मिळणार आहे.

4/6

'शान-ए-भोपाळ एक्सप्रेस'ला लावण्यात आलेले कोच आयसीएफचे आहेत. ते चेन्नईत तयार करण्यात आले आहेत. काही दशकानंतर रेल्वेचे कोच बदलण्यात येत आहेत. हळहळू अन्य रेल्वेला हे कोच लावले जाणार आहेत. 

5/6

या आधी झी २४ तासने सांगितले की, रेल्वेतील साइड बर्थला नवे रुप देण्यात येणार आहे. तशी तैयारी सुरु होती. आता शान-ए-भोपाळ एक्स्प्रेसला हे कोच लावण्यात येत आहेत. आधीच्या कोचमध्ये फोल्डिंगचे होते. यामुळे प्रवाशाला अधिक समस्यांचा सामना करावा लागत होता. पाठिचे दुखणे यांचा सामना करावा लागत होता. कारण दोन सीटमध्ये गॅप राहायचे. 

6/6

शान-ए-भोपाळ एक्सप्रेस' शिवाय हबीबगंज ते जबलपूर दरम्यान चालू असलेल्या जनशताब्दी एक्सप्रेसमध्येही एलएचबी कोच लावण्यात येणार आहेत. हे कोच बसण्यासाठी आरामदायी आहेत. तसेच आधुनिक सुविधा युक्त आहेत.