सोन्याचे दर 70 हजारांवर जाणार; गुंतवणूक केलेल्यांना सोन्यासारखे दिवस येणार

Gold Rates Latest News : आपल्या खिशाला परवडेल अशा स्वरुपात सोन्याची खरेदी करण्याकडे अनेकांचाच कल दिसून येत आहे. 

Nov 16, 2023, 13:06 PM IST

Gold Rates Latest News : दिवाळीचा माहोल अद्यापही सरलेला नाही. म्हणूनच की काय, सोनं खरेदीसाठी भाऊबीज उलटल्यानंतरही अनेकांनीच सराफांची वाट धरली आहे. 

1/7

सोन्यातील गुंतवणुक

gold rates today investment in Gold will make you rich latest update

Gold Rates Latest News : अशा या सोन्यातील गुंतवणुकीसाठीही बरीच मंडळी प्राधान्य देताना दिसतात. तुम्हाला ही गुंतवणूक चांगला परतावा मिळवून देऊ शकते. 

2/7

गुंतवणूक केलेल्यांना सोन्यासारखे दिवस

gold rates today investment in Gold will make you rich latest update

सोन्याचे दर 70 हजारांवर जाणार; गुंतवणूक केलेल्यांना सोन्यासारखे दिवस येणार आहेत. कारण, येत्या काळात सोन्याचे दर 70 हजारांचा आकडा ओलांडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.   

3/7

दरांमध्ये मोठ्या फरकानं वाढ

gold rates today investment in Gold will make you rich latest update

पुढील वर्षाच्या दिवाळीपर्यंत सोन्याचे दर मोठ्या फरकानं वाढणार असून, आतापर्यंत यामध्ये गुंतवणूक केलेल्यांना त्याचा फायदा वाढीव परताव्याच्या स्वरुपात घेता येणार आहे.   

4/7

राजकीय अस्थिरता

gold rates today investment in Gold will make you rich latest update

मध्य पूर्वेमधील राजकीय अस्थिरतेनंतर सोनं खरेदीला प्राधान्य मिळाल्याची बाब समोर आली आहे. त्यातच डॉलरची किंमत, व्याजदर, खनिज तेलाचे दर या साऱ्याचा परिणामही सोन्याच्या दरांवर होणार आहे. 

5/7

गुंतवणुकीचा आढावा

gold rates today investment in Gold will make you rich latest update

एका निरीक्षणातून समोर आलेल्या माहितीनुार मागील तीन वर्षांच्या सोन्याच्या गुंतवणुकीचा आढावा घेतल्यास 20 टक्के परतावा मिळाल्याचं निष्पन्न झालं आहे. 

6/7

दरांवर परिणाम

gold rates today investment in Gold will make you rich latest update

जागतिक स्तरावरील काही घटना या दरांवर परिणाम करताना दिसतील. यामध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पद निवडणुका, फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरातील कपात या साऱ्याचा समावेश आहे. 

7/7

दर वाढणार...

gold rates today investment in Gold will make you rich latest update

त्यामुळं तुम्ही सोनं घ्यायचा विचार करत असाल तर आताच संधी साधा नाहीतर हे दर आवाक्याबाहेर जातील...