Gold Price Today : सोने खरेदीदारांसाठी खुशखबर! पाहा किती रुपयांनी स्वस्त झालं सोने-चांदी...

Gold Silver Price Today : देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात तफावत दिसून येत आहे.  विविध कर आणि मेकिंग चार्जेसमुळे सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या किमती वाढतात. MCX आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सोने आणि चांदीचे दर करमुक्त आहेत. त्यामुळेच देशातील बाजारभावात तफावत आहे. जाणून घ्या आजचे सोने-चांदीचे दर...

Jun 14, 2023, 10:56 AM IST
1/6

आज 14 जून 2023 रोजी भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपासून सोन्याचे भाव कमी होत असून सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

2/6

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, मंगळवारी सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 59,772 रुपये होता. मागील व्यवहाराच्या दिवशी तो प्रति दहा ग्रॅम 59,921 रुपयांवर बंद झाला. त्यामुळे सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम 149 रुपयांची घसरण झाली आहे.

3/6

Gold Silver Price Today

सोने सध्या 1,813 रुपये प्रति 10 ग्रॅम या सार्वकालिक उच्चांकापेक्षा स्वस्त विकले जात आहे. 11 मे 2023 रोजी, रोझी सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 61585 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.  

4/6

Gold Silver Price Today

आज चांदीचा दर 73102 रुपये प्रति किलो इतका आहे. मागील व्यवहाराच्या दिवशी चांदी 73432 प्रति किलोवर बंद झाली होती. त्यामुळेच आज चांदीचा दर 330 रुपयांच्या घसरणीसह उघडला.   

5/6

Gold Silver Price Today

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याला वेग आला आहे. 4 ऑगस्ट 2023 रोजी सोन्याचा वायदा व्यापार 147 च्या वाढीसह 59,788 वर होत आहे. दुसरीकडे, 5 जुलै, 2023 रोजी, चांदीचा वायदा व्यवहार 433 रुपयेच्या वाढीसह 73,407 रुपयांवर होत आहे.

6/6

Gold Silver Price Today

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची झपाट्याने खरेदी-विक्री होत आहे. अमेरिकेत सोन्याचा भाव 2.82 डॉलरच्या वाढीसह 1,962.91 प्रति औंस दराने व्यवहार करत आहे.