गुगलच्या सीईओंना भारतीय पदार्थांची भुरळ, म्हणाले मुंबईत आल्यावर....

गुललचे  सीईओ सुंदर पिचाई यांना एका मुलाखतीत विचारलं की, तुम्हाला खायला काय आवडतं? त्यावर त्यांनी सांगितलं की त्यांना इंडियन फूड जास्त आवडतं.   

Jul 19, 2024, 13:03 PM IST
1/9

दिवसाला करोडोंचा उलाढाल सांभाळणारे गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सोशलमीडिया, AI चा भारतावर होणारा प्रभाव या संदर्भात माध्यमांशी चर्चा केली होती.    

2/9

या  मुलाखतीत त्यांना प्रश्न विचारला की, तुम्हाला खायला काय आवडतं, त्यावर सुंदर म्हणाले की मला भारतीय पदार्थ खायला खूप आवडतात. 

3/9

भारतीय जेवणाची लज्जत सातासमुद्रापार पोहोचली आहे. फक्त चवदार नाही तर आरोग्यवर्धक आणि पौष्टिक घटक असल्याने भारतीय पदार्थांना परदेशातही पसंती मिळते.   

4/9

झणझणीत आणि घरचं जेवण ही भारतीय जेवणाचं खास वैशिष्ट्य आहे. गुगलचे सीईओ सुंदर यांनी तीन शहरांची नावं सांगितली जिथे त्यांना खायला आवडतं. 

5/9

सुंदर म्हणतात की,  इंडियन फुड म्हटलं की माझ्या तोंडाला पाणी सुटतं. मला परदेशातील पदार्थांपेक्षा भारतीय जेवण जास्त आवडतं.   

6/9

सुंदर पुढे असंही म्हणतात की, जर मी मुंबईत गेलो तर मला पाव भाजी खायला जास्त आवडते. बटर पावभाजी खायला मी कधीच नकार देत नाही. 

7/9

जेव्हा मी, दिल्लीत जातो तेव्हा मला छोले भटूरेची आठवण येते. कामानिमित्त दिल्लीला गेल्यावर मी आवर्जून छोले भटूरे खातो.   

8/9

असं म्हणतात की एखादा पदार्थ हा त्या त्या ठिकाणीच खाल्ला तर तो छान लागतो. म्हणूनच मला कर्नाटकमध्ये गेल्यावर मसाला डोसा खाण्याचा मोह होतो.   

9/9

समुद्र आणि लोकलट्रेन याव्यतिरिक्त खाऊ गल्ली हे मुंबईचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. मुंबईच्या स्ट्रीटफू़डची खास गोष्ट म्हणजे इथे नवनवीन पदार्थ तयार केले जातात. त्यामुळे खवय्यांना चांगलीच पर्वणी मिळते. असं ते म्हणाले.