गुगल पे, पेटीएम आणि फोनपे 31 डिसेंबरपासून होणार बंद! कारण जाणून घ्या
UPI ID: अनेक वेळा यूजर्स त्यांचा जुना नंबर डिलिंक न करता नवीन आयडी तयार करतात. यामुळे त्यांची फसवणूक होण्याती शक्यता जास्त असते. अशा परिस्थितीत एनपीसीआयकडून जुना आयडी बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
UPI ID to be Discontinued: ज्या यूजर्सचे अकाऊंट्स एका वर्षापासून सक्रिय नसतील म्हणजेच ज्यांच्या यूपीआय आयडीवरु वर्षभरात कोणताही व्यवहार झाला नसेल, ते 31 डिसेंबर 2023 नंतर बंद होणार आहेत. एनपीसीआय ही एक नॉन प्रॉफीट ऑर्गनायजेशन असून भारताची रिटेल पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम आहे. एनपीसीआयच्या मार्गदर्शक तत्वावर गुगल पे, फोन पे आणि पेटीएम सारखे अॅप्स काम करतात. तसेच, कोणत्याही विवादाच्या बाबतीत, NPCI मध्यस्थ म्हणून काम करते.