Tulsi Rules : राम व कृष्ण तुळसमध्ये फरक काय? घरात कोणती तुळस शुभ? आर्थिक समस्यावर मात करण्यासाठी 'या' दिवशी लावा रोप

Tulsi Rules : येत्या 24 नोव्हेंबरला तुळशी विवाहला (tulsi vivah 2023) सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी घरात कुठली तुळस शुभ असते. त्याशिवाय कुठल्या दिवशी तुळस लावल्यास घरात आर्थिक फायदा होतो जाणून घेऊयात. 

Nov 20, 2023, 11:22 AM IST
1/7

तुळशीचे अनेक प्रकार आहेत. त्यातील राम आणि कृष्ण तुळस ही सहज कुठेही उपलब्ध असतात. सर्वसामान्यांना या दोन्ही तुळशीत नेमका फरक ओळखणे अनेक वेळा कठीण जातं.   

2/7

कृष्ण तुळशीची पानं ही गडद हिरव्या किंवा जांभळ्या रंगाची तर, राम तुळशीच्या पानांचा रंग हा हिरवा असतो. 

3/7

असं म्हणतात की कृष्ण तुळशी ही श्रीकृष्णाची आवडती आहे. या तुळशीची पानं देखील कृष्णाच्या रंगासारखीच दिसतात. या तुळशीच्या पानांत फारसा गोडवा आढळत नाही.

4/7

तर राम तुळस ही रामाची प्रिय आहे. राम तुळशीची पानं गोड असतात. ही तुळस घरामध्ये लावल्याने घरातील सुख-समृद्धी नांदते. त्याशिवाय राम तुळशीचा उपयोग पूजेत केला जातो.   

5/7

शास्त्रानुसार घरात राम की कृष्णा कुठली तुळस लावावी याबद्दल काय सांगितलं आहे. राम आणि कृष्ण तुळस दोघांचेही वेगळं महत्त्व आहे. या दोन्ही तुळशी घरात लावू शकता. प्रगतीचा मार्ग मोकळा होण्यासाठी राम तुळस घरात लावावी. 

6/7

तुम्हाला घरात तुळस लावायची असेल तर गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे शुभ दिवस आहे. गुरुवारी भगवान विष्णूचा आशिर्वाद प्राप्त होतो. तर शनिवारी तुळस लावल्यामुळे पैशांशी संबंधित समस्या दूर होते.  

7/7

तर एकादशी, रविवार, सोमवार, बुधवार आणि ग्रहणाच्या दिवशी चुकूनही तुळशीचं रोप लावू नका. तसंच या दिवशी तुळशीची पानं तोडू नका. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)