Weekly Numerology : मूलांक 4 आणि 9 लोकांसाठी राजयोग, जाणून घ्या 'या' आठवड्यात तुमच्या नशिबात काय?

Saptahik Ank jyotish 14 to 20 october 2024 In Marathi : ऑक्टोबरचा तिसऱ्या आठवडा प्रदोष व्रत आणि कोजागिरी पौर्णिमेचा शुभ संयोग जुळून आला आहे. अशात वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्रानुसार हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. अंकशास्त्रानुसार तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो.

| Oct 14, 2024, 13:15 PM IST
1/9

मूलांक 1

या आठवड्यात तुम्ही संयमाने कोणताही निर्णय घेणं तुमच्या हिताच ठरणार आहे. तरच सुख आणि समृद्धी तुमच्या आयुष्यात नांदणार आहे. कामाच्या ठिकाणी वाद चुकूनही करु नका. आर्थिक बाबींमध्ये तुम्हाला हवे असलेले बदल साध्य करण्यासाठी अधिक वेळ लागणार आहे. प्रेम संबंधात तुम्ही केलेले प्रयत्न तुमच्यासाठी चांगला काळ आणणार हे नक्की. आठवड्याच्या शेवटी स्थिती सुधारणार आहे. जीवनात तुम्हाला आराम मिळणार आहे. 

2/9

मूलांक 2

तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती होणार असून तुम्ही तुमच्या प्रकल्पात यशस्वी होणार आहे. आर्थिक बाबींसाठी हा आठवडा शुभ असून आर्थिक लाभ होणार आहे. प्रेमाच्या नात्यात लक्ष केंद्रित करणे गरजेचे असणार आहे, तरच जीवनात शांतता अनुभवता येणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला खूप आराम वाटणार आहे. 

3/9

मूलांक 3

कामाच्या ठिकाणी प्रगती होणार असून आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला चांगली बातमी कानावर पडणार आहे. आर्थिक बाबतीत वेळ हळूहळू सुधारणार आहे. प्रेमाच्या नात्यात तुम्हाला थोडेसे बंधन जाणवणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला चांगली बातमी कानावर पडणार आहे. 

4/9

मूलांक 4

कामाच्या ठिकाणी प्रगती होणार असून या आठवड्यापासून तुमच्या करिअरमध्ये आणि आयुष्यात अनेक गोष्टी बदलणार आहे. प्रगतीचा मार्ग मोकळा होणार आहे. आर्थिक बाबतीत तुम्हाला मध्यम यश प्राप्त होणार आहे. प्रणय हळूहळू तुमच्या प्रेमसंबंधात प्रवेश करणार आहे. आर्थिक प्रश्न वाटाघाटीतून सोडवले तरच तुमच्या हिताच ठरेल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला काही चांगली बातमी मिळणार आहे. 

5/9

मूलांक 5

कामाच्या ठिकाणी प्रगती होणार असून नवीन सुरुवात तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी असणार आहे. आर्थिक बाबतीतही हा आठवडा शुभ असणार आहे. आर्थिक लाभ आणि भविष्यातील आर्थिक बाबींबाबत तुम्ही नियोजनबद्ध मूडमध्ये राहणार आहात. या आठवड्यात प्रेमसंबंधात अडचणी जाणवणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्ही तुमच्या विचारावर ठाम राहिल्यास भविष्यात तुम्हाला जीवनात नक्कीच सुखद अनुभव येणार आहे. 

6/9

मूलांक 6

हा आठवडा संयम वापरून कोणताही निर्णय घेण्याचा आठवडा राहणार आहे. आर्थिक बाबतीत काळ कठीण असणार आहे. परिस्थिती तुमच्यावर वर्चस्व गाजवणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये चढ-उतार असतील पण शेवटी गोष्टी चांगल्या होणार आहेत. कामाच्या ठिकाणी आळस टाळलात तर बरे होईल. आठवड्याच्या शेवटी स्थिती हळूहळू सुधारणार आहे. 

7/9

मूलांक 7

नोकरीच्या ठिकाणी प्रगतीसोबतच मान-सन्मानही वाढणार आहे. तुमची अंतर्ज्ञान आणि झटपट निर्णय घेण्याच्या क्षमतेच्या मदतीने तुम्ही तुमच्या प्रकल्पात यशस्वी मिळवणार आहात. आर्थिक बाबतीत वेळ अनुकूल राहणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला काही वेदना जाणवतील. आर्थिक लाभाचे संकेतही दिसत आहेत. प्रेमसंबंधात काळ अनुकूल राहणार असून आठवड्याच्या शेवटी भावनिक त्रास राहणार आहे. 

8/9

मूलांक 8

नोकरीच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. तरुणांच्या मदतीने प्रकल्प वेळेत पूर्ण होणार आहे. आर्थिक बाबतीत वेळ अनुकूल राहणार आहे. तुमच्या पैशांशी संबंधित बाबींमध्ये तुम्ही निवांत राहणार आहात. प्रेमसंबंधांमध्ये एकटेपणा जाणवेल. आठवड्याच्या शेवटी स्थिती सुधारणार असून तुम्ही प्रसन्न असणार आहात. 

9/9

मूलांक 9

कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. तुमचा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी तुम्हाला कोणाची तरी मदत मिळणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. जीवनात सुख-समृद्धीचे योगायोग येतील. प्रेम संबंधात, परस्पर प्रेम मजबूत असेल आणि प्रेम जीवन रोमँटिक राहणार आहे. आठवड्याच्या शेवटी आनंद आणि समृद्धीच्या शुभ संधी प्राप्त होणार आहे. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)