खुशखबर : लवकरच भारतीयांसाठी करतारपूर गुरुद्वारा खुलं होणार

Sep 07, 2018, 16:19 PM IST
1/6

पाकिस्तानचा निर्णय

पाकिस्तानचा निर्णय

भारत - पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या करतारपूर साहिब गुरुद्वारा श्रद्धांळूसाठी महत्त्वाचं ठिकाण आहे. आता, पाकिस्ताननं करतारपूर कॉरिडोर उघडण्याचा निर्णय घेतलाय. शीख समाजाकडून प्रदीर्घ काळापासून करतारपूर प्रवेशाची मागणी केली जात होती

2/6

गुरुनानकांची पुण्यतिथी

गुरुनानकांची पुण्यतिथी

22 सप्टेंबर रोजी शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांची 550 वी पुण्यतिथी साजरी होणार आहे. याच मुहूर्तावर करतारपूर कॉरीडोर उघडण्यात येणार आहे. 

3/6

गुरुनानकांचा सहवास

गुरुनानकांचा सहवास

या स्थळाला गुरुनानकांचा 17 वर्षांचा सहवास लाभलाय. 22 सप्टेंबर 1539 रोजी गुरुनानक यांचा मृत्यू करतारपूरमध्ये झाला होता.

4/6

गुरुनानकांचं समाधीस्थळ

गुरुनानकांचं समाधीस्थळ

करतारपूरमध्येच गुरुनानक साहेबांचं समाधीस्थळ आहे. हे ठिकाण 'करतारपूर साहिब' म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे करतारपूर कॉरिडोर उघडण्यासाठी हीच तारीख निर्धारित करण्यात आलीय.

5/6

करतारपूर साहिब

करतारपूर साहिब

करतारपूरमध्येच गुरुनानक साहेबांचं समाधीस्थळ आहे. हे ठिकाण 'करतारपूर साहिब' म्हणून ओळखलं जातं. 

6/6

सिद्धूंची मेहनत फळाला

सिद्धूंची मेहनत फळाला

'माझा मित्र इमरान खाननं माझं जीवन सफल केलं' अशी प्रतिक्रिया कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांनी दिलीय. दिवसांपूर्वी पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू इमरान खान यांच्या शपथग्रहण सोहळ्याला सिद्धू यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर लष्करप्रमुखांना मारलेल्या मिठीनंतर नवज्योत सिंह सिद्धू यांना मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं