एक केस ही गळणार नाही, घनदाट केसांसाठी करा 'हे' उपाय

तज्ञांच्या म्हणण्यानुसार केसांच्या वाढीसाठी जसं बाहेरून उपाय केले जातात, तसंच केसांचं  पोषण होण्याकरीता योग्य आहार घेणं महत्त्वाचं ठरतं. जाणून घेऊयात घनदाट केसांसाठी कोणत्या सप्लीमेंट फायदेशीर ठरतात.   

Mar 12, 2024, 16:13 PM IST

Strong Thick Hair Home Remedies:  वाढत्या प्रदूषणामुळे आणि धावपळीच्या जीवनशैलीचा गंभीर परिणाम केसांच्या आरोग्यावर होतो. केसगळणं, केसांत कोंडा होणं या समस्या अनेकांना भेडसावतात. केसगळती घरगुती उपाय म्हणून कोरफडीचा गर लावणं, केस कोरडे होऊ नये याकरीता केसांना अंड लावणं असे अनेक उपाय केसांवर केले जातात. 

1/5

बायोटिन (Biotin):

व्हिटामीन सी आणि व्हिटामीन केची शरीरात कमतरता निर्माण झाल्याने केसगळती होते. त्यामुळे  केसांचं थांबण्याकरीता अनेक उपाय करूनही पाहिजे तसा फरक पडत नाही. म्हणूनच तज्ञांच्या म्हणण्यानुसार सप्लीमेंट घेणं फायदेशीर ठरतं. बायोटिन (व्हिटामीन B7) मुळे केसांना मजबुती मिळते.केसांना प्रोटीन मिळण्यासाठी केरॉटीन फायदेशीर असतं. बायोटिनमुळे केरॉटीनचं प्रमाण वाढण्यास मदत होते.  

2/5

ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड (Omega-3 Fatty Acids):

हृदयाचं आरोग्य नियंत्रित राहण्यासाठी ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड फायदेशीर ठरतं. शरीराला रक्तपुरवठा सुरळीत झाल्याने स्कॅल्पला खाज येण्याची समस्या दूर होते. मासे, बदाम आणि हिरव्या पालेभाज्या  यात  ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे केस मुलायम आणि घनदाट होण्यास मदत होते. 

3/5

व्हिटामीन D

शरीरात D ची कमतरता असल्यास केसांची वाढ होण्यास समस्या निर्माण होतात. रोज सकाळी कोवळ्या ऊन्हात फिरल्याने शरीराला व्हिटामीन D मात्रा मिळते. जर तुमच्या शरीरात याची अतिरिक्त कमतरता जाणवत असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने केसांच्या वाढीसाठी व्हिटामीन D सप्लीमेंट्स घेऊ शकता. 

4/5

आयर्न (Iron):

मासिकपाळीध्ये अतिरिक्त रक्तस्राव होत असल्याने अनेकदा महिलांना आयर्नची कमतरता जाणवत असते. आयर्नची मात्रा कमी असल्याने अ‍ॅनिमिया सारखे आजार वाढतात. आयर्नमुळे  केसांना ऑक्सिजन घेण्यास मदत होते. आयर्नच्या सप्लीमेंट घेतल्यास केसांची मुळं मजबूत होतात.     

5/5

झिंक (Zinc)

घनदाट केसांठी जिंकची मात्रा सर्वांत महत्त्वाची असते. जिंकमध्ये असलेल्या मिनरलमुळे स्कॅल्प कोरडी होत नाही. केसांत कोंडा झाल्याने चेहऱ्यावर मुरूम येण्याची समस्या  निर्माण होते. शरीराला जिंकची मात्रा मिळाल्याने स्कॅल्पला नैसर्गिकरीत्या तेल सुटतं आणि केस कोरडे होण्यापासून वाचतात. जिंकची सप्लीमेंट घेतल्यास केसात कोंडा होत नाही. त्यामुळे केसगळतीचं प्रमाण कमी होतं. (वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारित असून, आरोग्यविषयक निर्णयांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.)