हनुमानाची 9 नावे आणि अर्थ जी मुलांसाठी ठरतील अतिशय खास

Hanuman Names for Baby Boy : हनुमान हे एक लोकप्रिय हिंदू दैवत आहे. हनुमान म्हणजेच मारुती ही रामायणातील एक लोकप्रिय व्यक्तिरेखा असून ते प्रभू श्री रामांचे महान भक्त, दास, दूत मानले जातात. या भक्ताच्या नावावरुन ठेवा तुमच्या मुलाचे नाव.  

| Dec 31, 2023, 16:16 PM IST

Indian Baby Boy Names And Meaning : हनुमान हे एक लोकप्रिय हिंदू दैवत आहे. हनुमान म्हणजेच मारुती ही रामायणातील एक लोकप्रिय व्यक्तिरेखा असून ते प्रभू श्री रामांचे महान भक्त, दास, दूत मानले जातात. आजच्या या लेखात आपण हनुमानाची बारा नावे व त्याचबरोबर त्यांचे अर्थ जाणून घेणार आहोत. हनुमानाची चमत्कारी बारा नावे ही भक्तांचे सर्व संकट निवारण करणारी नावे आहे.

1/10

2/10

मकरध्वज

Hanuman 9 Names For Baby Boy

मकरध्वज हे खरं तर भगवान हनुमानाचा पुत्र असल्याचे मानले जाते. ग्रंथामध्ये उल्लेख असल्याप्रमाणे हनुमानाच्या घामापासून मकरध्वजाचा जन्म झाला होता. रामायणामध्ये या नावाचा उल्लेख करण्यात आल्याचेही सांगण्यात येते. हे नाव हनुमानाशी जोडलेले असून वेगळे असल्यामुळे तुम्ही आपल्या मुलाच्या नावासाठी विचार करू शकता.

3/10

रुद्रांश

Hanuman 9 Names For Baby Boy

हनुमानाला भगवान शिवाचा रूद्र अवतार मानण्यात येते. धर्मग्रंथात सांगण्यात आल्याप्रमाणे हनुमान हे भगवान शिवाचे एक रूप आहेत. त्यामुळे भगवान शंकराचा एक अंश म्हणून रौद्र रूप धारण केलेला एक अंश अर्थात रुद्रांश असे नावही हनुमानाचे आहे.

4/10

चिरंजीवी

Hanuman 9 Names For Baby Boy

हनुमानाचे एक नाव चिरंजीवीदेखील आहे. कायम अमर राहणारा अर्थात चिरंजीवी. हनुमान हे त्या देवतांपैकी एक आहेत ज्यांना अमरत्व प्राप्त झाले आहे. अजरामर असणारा अर्थात चिरंजीवी. 

5/10

महावीर

Hanuman 9 Names For Baby Boy

हनुमानाच्या नावांपैकी एक नाव महावीर असेही आहे. हनुमान चालिसामध्ये महावीर या नावाचा समावेश आहे. सर्व वीरांचा वीर अर्थात महावीर. धैर्यवान असणारा महावीर असे तुम्ही तुमच्या बाळासाठी नाव निवडू शकता.

6/10

रुद्राय

Hanuman 9 Names For Baby Boy

रूद्राय अर्थात भगवान शंकरापासून उत्पन्न झालेला. हनुमान हा शंकराचा अवतार मानला जातो हे सर्वांनाचा माहीत आहे. पुराण कथांमध्ये सांगण्यात आल्याप्रमाणे शंकरापासून हनुमानाचा जन्म झाला आहे. त्यामुळे त्याला रूद्राय हे नाव देण्यात आले आहे. 

7/10

शौर्य

Hanuman 9 Names For Baby Boy

शौर्य अर्थात निर्भय, पराक्रमी आणि बहादूर असा. हनुमानाचे सर्व गुण या नावात एकवटलेले आहेत. तसंच आधुनिक नावांमध्ये शौर्य हे नाव परफेक्ट फिट होते. हनुमानाचे हे नाव आपल्या मुलासाठी तुम्ही निवडा.

8/10

तेजस

Hanuman 9 Names For Baby Boy

हे नाव जरा कॉमन असले तरीही हनुमानाशी संबंधित आहे. तेजस अर्थात असा व्यक्ती ज्यामध्ये तेजस्वीपणा ठासून भरला आहे. तेजस हे आधुनिक नाव असून त्याचा अर्थ हनुमानाशी संबंधित आहे.

9/10

रीतम

Hanuman 9 Names For Baby Boy

हनुमानासारखा पवित्र आणि सुंदर मनाचा. हनुमान हे खूपच निर्मळ अशा मनाचे होते.

10/10

अजेश

Hanuman 9 Names For Baby Boy

आयुष्य जगणारा, भगवान हनुमान, अजिंक्य, कोणाकडून पराभूत न होणारा देव असा या नावाचा अर्थ आहे.