Happy Birthday: धर्मेंद्र यांनी प्रेमासाठी बदलला धर्म

धर्मेंद्र, हेमा मालिनी आणि बरचं काही... 

Dec 08, 2019, 10:47 AM IST

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांनी एकेकाळी सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. 'शोले', 'प्रतीज्ञा', 'मेरा गाव, मेरा देश', 'यमला पगला दिवना' यांसारखी अनेक हीट चित्रपटं त्यांनी कलाविश्वाला दिली आहेत. त्यांची अनेक चित्रपटं बरीच गाजली. त्यांच्या चित्रपटाप्रमाणे त्यांचं प्रेम प्रकरण देखील तेवढंच चर्चेत होतं. अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या नात्याच्या चर्चांना चांगलेच उधाण आले. 

1/7

धर्मेंद्र यांनी प्रेमासाठी बदलला धर्म

धर्मेंद्र यांनी प्रेमासाठी बदलला धर्म

धर्मेंद्र यांचा जन्म १९३५ साली पंजाबच्या फगवाडामध्ये झाला. मुंबई फिल्मफेअर टॅलेंट हन्टमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी १९५८ साली स्वप्नांच्या नगरीत पाय ठेवला. पण याठिकाणी त्यांची ओळख दिग्दर्शक अर्जुन हिंगोरानी यांच्याशी झाली आणि त्यांचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला.   

2/7

धर्मेंद्र यांनी प्रेमासाठी बदलला धर्म

धर्मेंद्र यांनी प्रेमासाठी बदलला धर्म

१९६० सली त्यांनी 'दिल भी तेरा, हम भी तेरे' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पाय ठेवला. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेला चाहत्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले. त्यानंतर 'सीता और गीता' चित्रपटानंतर तर त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून गेले.   

3/7

धर्मेंद्र यांनी प्रेमासाठी बदलला धर्म

धर्मेंद्र यांनी प्रेमासाठी बदलला धर्म

याचदरम्यान त्यांच्या आयुष्यात हेमा मालिनी यांची एन्ट्री झाली. पत्नी आणि दोन मुले असताना देखील त्यांनी हेमा मालिनींना मागणी घातली होती. चित्रपटाच्या सेटवर त्यांनी हेमा मालिनींना मागणी घातली.   

4/7

धर्मेंद्र यांनी प्रेमासाठी बदलला धर्म

धर्मेंद्र यांनी प्रेमासाठी बदलला धर्म

पण त्यावेळेस हेमा यांनी त्यांच्या मागणीला नकार दिला. दोघांनी एकत्र अनेक चित्रपटं साकारले आहेत. 'शोले' चित्रपटा दरम्यान हेमा यांचयासोबत अधिक वेळ व्यतीत करता यावा यासाठी ते एक सीन अनेक वेळा करत असे.   

5/7

धर्मेंद्र यांनी प्रेमासाठी बदलला धर्म

धर्मेंद्र यांनी प्रेमासाठी बदलला धर्म

१९७८ साली हेमा यांच्या वडिलांचा अचानक मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर त्या फार खचल्या होत्या. त्यावेळेस धर्मेंद्र यांनी त्यांना एकटं सोडलं नाही. त्यानंतर हेमा यांनी धर्मेंद्रंना लग्नासाठी होकार दिला.   

6/7

धर्मेंद्र यांनी प्रेमासाठी बदलला धर्म

धर्मेंद्र यांनी प्रेमासाठी बदलला धर्म

परंतु, कायद्यानुसार पहिली पत्नी असताना दुसरं लग्न करणं शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी मुस्लीम धर्म स्वीकारला आणि दोघांनी लग्न केलं.   

7/7

धर्मेंद्र यांनी प्रेमासाठी बदलला धर्म

धर्मेंद्र यांनी प्रेमासाठी बदलला धर्म

निकाहनाम्यानुसार धर्मेंद्र यांचे नाव दिलावर खान आणि हेमा यांचे नाव आयशा बी असे होते.