PHOTO : एक चूक आणि 6 महिन्यासाठी स्मरणशक्ती गेली; 500 रुपये घेऊन मुंबईत आलेली तरुणी आज आहे कोट्यधीश

Entertainment : सोबत 500 रुपये घेऊन ती मुंबईला आली. मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली पण अभिनेत्री म्हणून पहिला ब्रेक हा साऊथ चित्रपटातून तिला मिळाला. 

Jun 13, 2024, 12:05 PM IST
1/7

पण या फोटोमधील चिमुकलीला खरी ओळख 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' आणि 'बागी 2' या दोन चित्रपटातून मिळाली. तुम्हाला कळलं असेल आम्ही कोणाबद्दल बोलतोय ते. 

2/7

आज दिशा पटानीचा 32 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिच्याबद्दल माहिती नसलेल्या रंजक गोष्टींवर आपण एक नजर टाकणार आहोत. बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्री म्हणून तिला पाहिलं जातं. 

3/7

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, दिशाला अभिनय नाही तर एअरफोर्स पायलट व्हायचं होतं. तिने लखनऊमधून एमिटी युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलंय. पण कॉलेजमध्येच तिने मॉडेलिंगला सुरुवात केली आणि ती ग्लॅमरच्या दुनियेकडे वळली. 

4/7

वयाच्या 17 व्या वर्षी तिने पहिलं फोटोशूट केलं. त्यानंतर 2015 मध्ये तिने तेलुगू चित्रपटातील लोफरमधून करिअरला सुरुवात केली. 

5/7

त्यानंतर 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी'मधून तिने सुशांत सिंग राजपूतसोबत बॉलिवूडमझ्ये एन्ट्री घेतली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिशा पटनी केवळ 500 रुपये घेऊन मुंबईत आली होती.

6/7

खुद्द अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, जिम्नॅस्टिक्सचे प्रशिक्षण घेत असताना ती डोक्यावर पडली होती. ही दुखापत इतकी गंभीर होती की सहा महिने तिची स्मरणशक्तीही गेली होती. 

7/7

दिशाच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचं झालं तरी तिच्याकडे 75 कोटी रुपये आहेत. अभिनय, मॉडेलिंग आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून ती प्रचंड कमाई करते. ती एका चित्रपटासाठी 6 ते 7 कोटी रुपये मानधन घेते. मुंबईत एका आलिशान घर असून त्याची किंमत 5 कोटी आहे. तर मिनी कूपर, मर्सिडीज बेंज आणि ऑडी या कार आहेत.