सचिन द ग्रेट, क्रिकेटच्या देवाचे मैदानाबाहेरचे कधीही न पाहिलेले टॉप 10 फोटो

Sachin Tendulkar Unseen Photos: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज आपला पन्नासवा वाढदिवस (Sachin Tendulkar 50th Birthday) साजरा कतर आहे. क्रिकेटच्या मैदानावर खेळताना त्याला सर्वांनीच पाहिलं आहे. पण आज आम्ही तुम्हाला सचिनचे मैदानाबाहेरचे काही खास फोटो दाखवणार आहोत. क्रिकेटव्यतिरिक्त समाजकारणात आणि राजकारणातील काही प्रसंग कॅमेरात कैद करण्यात आले आहेत. सचिनचे असेच काही खास कँडिड फोटो आम्ही आज सचिनच्या चाहत्यांसाठी घेऊन आलोय.

Apr 24, 2023, 11:30 AM IST
1/9

Sachin Tendulkar Unseen Photos

सचिनच्या आयुष्यात आई-वडिलांनंतर सर्वात महत्त्वाचं स्थान आहे ते त्याचे कोच सर रमाकांत आचरेकर यांचं. आचरेकर सरांची कडक शिस्त आणि त्यांच्या शिकवणीमुळे सचिन यशाच्या शिखरावर पोहोचला.

2/9

Sachin Tendulkar Unseen Photos

सचिनची क्रिकेट कारकिर्द असो की त्याचं सामाजिक काम असो. पत्नी अंजिलाचा त्याला नेहमीच पाठिंबा राहिला आहे. चढ-उताराच्या काळात  सचिनच्या मागे अंजली खंबीरपणे उभी राहिलीय.

3/9

Sachin Tendulkar Unseen Photos

सचिन तेंडुलकर राज्यसभा सदस्यही होता, यादरम्यान त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. 

4/9

Sachin Tendulkar Unseen Photos

मुंबईतील एका शाळेचा वर्ग बांधण्यासाठी सचिनने आर्थिक सहाय्य केलं होतं. इतकंच नाही तर त्या शाळेला सरप्राईज व्हिजीट देत विद्यार्थ्यांबरोबर गप्पाही मारल्या

5/9

Sachin Tendulkar Unseen Photos

भारतीय एअरफोर्सच्या संचलनादरम्यान गाझियाबादमध्ये Hindon Air Force base याठिकाणी सचिन उपस्थित होता.

6/9

Sachin Tendulkar Unseen Photos

सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकरने अमृतसरमधल्या सुवर्ण मंदिरात भेट दिली होती

7/9

Sachin Tendulkar Unseen Photos

एका कार्यक्रमात सचिनने राजस्थानी पगडी घालून अगदी दिलखुलासपणे फोटोशूट केलं.

8/9

Sachin Tendulkar Unseen Photos

Sachin Tendulkar Unseen Photos

सचिन आणि विनोद कांबळीची दोस्ती क्रिकेट जगतात सर्वांनाच माहित आहे. सचिन-विनोद जोडीने शालेय क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड केलेत.

9/9

Sachin Tendulkar Unseen Photos

Sachin Tendulkar Unseen Photos

सचिन क्रिकेटव्यतिरिक्त सामाजिक कार्यातही नेहमीच अग्रेसर राहिला आहे. स्वच्छ भारत मोहिमेत त्याने मुलगा अर्जुनसह सहभाग घेतला होता.