सचिन तेंडुलकरचे 'ते' सात विक्रम, क्रिकेट इतिहासात आजही आहेत अबाधित

7 Unbreakable Record of Sachin Tendulkar : क्रिकेटच्या इतिहासात सचिन अध्याय सुवर्ण अक्षराने कोरला गेलाय. सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) क्रिकेट जगतावर तब्बल 24 वर्ष अधिराज्य केलं.  क्रिकेट खेळणाऱ्या जगातील सर्वच संघांविरुद्ध आणि जगातील सर्वच क्रिकेट मैदानांवर सचिनने आपल्या कामगिरीची छाप उमटवली आहे. सचिनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या आता 8 वर्ष होतील, पण सचिनच्या नावावर असे काही विक्रम आहेत, जे आजही कोणी तोडू शकलेलं नाही (Sachins Unbreakable Records).

Apr 24, 2023, 11:18 AM IST
1/7

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा

Sachin Tendulkar World cup 2011

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. आंतरराष्ट्रीय एकदिवस आणि कसोटी क्रिकेटध्ये सचिनने तब्बल 34,357 धावा केल्या आहेत. यात कसोटी क्रिकेटमध्ये 15,921 एकदिवसीय क्रिकेटमध्ये 18,426 धावा केल्या आहेत. 

2/7

सर्वाधिक 50 हून अधिक धावा

Sachin Tendulkar

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 आणि त्याहून जास्त धावा करणारा सचिन हा आजही एकमेव क्रिकेटर आहे. तब्बल 264 वेळा त्याने ही कमाल केली आहे. यात 145 वेळा एकदिवसीय क्रिकेटमध्ये आणि 119 वेळा कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 50 हून अधिका धावा केल्या आहेत. 

3/7

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम

Sachin Tendulkar

सचिन तेंडुलकर आपल्या 24 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत तब्बल 664 सामने खेळला. यात तो 200 कसोटी सामने आणि 463 एकदिवसीय सामने खेळलाय. आजपर्यंत एकही क्रिकेटपटू इतके आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला नाही.

4/7

एका क्रमांकावर खेळताना सर्वाधिक धावा

Sachin Tendulkar

फलंदाजीत एकाच क्रमांकवर खेळताना कारकिर्दीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही सचिनच्या नावावर जमा आहे. सचिन तेंडुलकरने भारतीय संघासाठी चौथ्या क्रमांकावर खेळताना 275 इनिंगमध्ये 54.40 च्या रनरेटने तब्बल 13,492  धावा केल्या आहेत.

5/7

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार

Sachin Tendulkar

सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल 2 हजाराहून अधिक चौकार लगावले आहेत. कोणत्याही क्रिकेटपटूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतके चौकार लगावलेले नाहीत. सचिनच्या नावार कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल 2058 चौकार जमा आहेत. 

6/7

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक मॅन ऑफ द सीरिज

Sachin Tendulkar

सचिन तेंडुलकरने आपल्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीत तब्बल 15 वेळा मॅन ऑफ द सीरिजचा खिताब पटकावला आहे. 108 एकदिवसीय मालिकेत त्याने ही कामगिरी केली आहे. एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील हा विक्रम आजही अबाधित आहे. 

7/7

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच

Sachin Tendulkar

सचिन तेंडुलकरने आपल्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीत तब्बल 62 वेळा मॅन ऑफ द सीरिजचा खिताब पटकावला आहे.