close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

Happy Birthday Sonam: ...बॉलिवूडची स्टाईल आयकॉन

बॉलिवूडची स्टाईल आयकॉन असणारी अभिनेत्री सोनम कपूरने आज ३४व्या वर्षात पदार्पण केले आहे. 

Jun 09, 2019, 14:51 PM IST

मुंबई : बॉलिवूडची स्टाईल आयकॉन असणारी अभिनेत्री सोनम कपूरने आज ३४व्या वर्षात पदार्पण केले आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सोनमने आपला वढदिवस मोठ्या थाटात साजरा केला. तिच्या कुटुंबियांकडून आणि मित्र परिवाराकडून तिला शुभेच्छा देण्यात आल्या. त्याचप्रमाणे पती आनंद आहूजाने अनोख्या पद्धतीत सोनमवर शुभेच्छांचा वर्षाव केला. सोशल मीडियावर सोनमच्या वाढदिवसाचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. त्यातील काही निवडक फोटो...

1/5

सोनमच्या वाढदिवसाचे औचित्य साधत रात्री १२ नंतर केक कट करण्यात आला. चाहत्यांनी सुद्धा तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

2/5

सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंदने सोनमला शुभेच्छा दिल्या आहेत. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत त्याने सोनमला कधी 'बेटा' तर कधी 'माया लोला' म्हणून आपले प्रेम व्यक्त केले आहे.  

3/5

ग्लॅमरच्या या जगात सोनम बॉलिवूडची ‘फॅशनिस्टा’ म्हणूनही सोनम नावारुपास आली. 

4/5

सोनमने संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘सावरियाँ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील गण्यांना तरूणाईने चांगलेच डोक्यावर घेतले होते.

5/5

‘आय हेट लव्ह स्टोरी’, ‘आयशा’ यांसारख्या चित्रपटांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली. मात्र इथेही तिला अपेक्षित यश मिळाले नाही. पण फॅशन जगतात तिचा वावर उल्लेखनीय ठरत होता आणि ठरत आहे.